यवतमाळ-कळंब रोडवरील टाटा एस आणि ट्रॅक्टर मध्ये जेरदार धडक
X
म- मराठी न्यूज नेटवर्क
यवतमाळ/कळंब (अनवर अली) : कळंब यवतमाळ हायवे रोडवरील घोटी गावाजवळ दि. ९ फेब्रुवारी २०२१ चे रात्री ७.३० वाजताचे दरम्यान ट्रक्टर क्रमांक एम एच २९/एबी ४६४० च्या चालकाने टाटा एस मालवाहू वाहन क्रमांक एम एच २९/टी ४०६१ ला समोरा समोर जबर जबर धडक दिल्याने टाटा एस मधिल मंगेश टेकाम., नारायण टेकाम रा. वंडली, तालुका कळंब हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार कळंब तालुक्यातील वंडली येथिल मालवाहू टाटा एस चा मालक ज्ञानेश्वर मारोती पारिसे व शेतकरी नारायण टेकाम व मुलगा मंगेश नारायण टेकाम रा. वंडली हे मालवाहू टाटा एस वाहनाने यवतमाळ येथील मार्केट मध्ये शेतकरनारायण टेकाम यांच्या शेतामधिल निघालेल्या तुरी विकण्यासाठी दि. ९ फेब्रुवारी रोजी गेले व तुरी विकुन गावाकडे परत येत असताना रात्री ७.३० वाजताचे दरम्यान समोरुन भरधाव वेगाने राँगसाईडने निष्काळजीपणे ट्रक्टर चालक वाहन चालवित येऊन टाटा एस मालवाहू वाहनाला जबर धडक दिली. व टाटा एस ला डीवाडर पर्यंत घासत नेले असता मालवाहू वाहनाची मोडतोड झाली व त्यामध्ये बसुन असलेले शेतकरी नारायण टेकाम, मालवाहू गाडीचा चालक ज्ञानेश्वर मारोती पारिसे हे गंभीर जखमी झाले तर मंगेश टेकाम किरकोळ जखमी झाला. जखमींना अमोल रामगडे व काही युवकांनी कळंब ग्रामीण रुग्णालयात आणले असता प्रथमोपचार करुन यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. अशा मालवाहू चालकाच्या फिर्यादी वरुन कळंब पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित राठोड यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार. नितीन कडुकर करीत आहेत.