Home > Crime news > वादावादीतुन झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु,मंगरुळपीर तालुक्यातील जांब येथील घटना

वादावादीतुन झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु,मंगरुळपीर तालुक्यातील जांब येथील घटना

वादावादीतुन झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु,मंगरुळपीर तालुक्यातील जांब येथील घटना
X

वाशिम-मंगरूळपीर येथून जवळच असलेल्या मौजा जांब येथे दिनांक 6/ 2/2021, शनिवार संध्याकाळी 6:50 ते 7: 30 या दरम्यान मुठाळ परीवार व बोथे परीवार यांच्यात गोठा व राहाते घर या जाग्याच्या जुन्या वादातुन पुन्हा वाद निर्माण झाला होता.त्या वादाचे स्वरुप हाणामारीत झाले व मारामारी चालु असतांना गावातील जेष्ठ नागरीक भगवानराव सखाराम अव्हाळे वय 65 वर्ष हे शौचाला बाहेर जात असताना आरोपीतांनी त्यांच्या डोक्यावर मारल्यामुळे गंभीर इजा होऊन त्यांची प्राणज्योत मालवली.फिर्यादी अमोल भगवान आव्हाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी देवलाल महादेव बोथे,अमोल देवलाल बोथे ,नंदिनी मोतीलाल बोथे, सुनिता संतोष मस्के, आशिष संतोष मस्के यांच्यावर अपराध क्रमांक 62 / 2021 कलम 302,147,506 आय पी सी नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर राठोड ,सुनील गंडाईत तुकाराम राठोड हे करत आहेत .

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 7 Feb 2021 10:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top