Home > Crime news > वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा येथे अवैध गुटखा पोलिसांनी केला जप्त

वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा येथे अवैध गुटखा पोलिसांनी केला जप्त

Police seize illegal gutkha at Kinhiraja in Washim district

वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा येथे अवैध गुटखा पोलिसांनी केला जप्त
X

फुलचंद भगत

वाशिम-पो.स्टे. जऊळका अंतर्गत दि.04/02/2021 रोजी ग्राम किन्हीराजा येथे गुटखा विक्री करणा-या ईसमावर छापा मारून कार्यवाही केली असता त्याचे कडुन एकुन 17576 /- रू चा गुटखा पानमसाला तंबाखु, तंबाखुजन्य पदार्थाचा माल जप्त करून कार्यवाही करण्यात जऊळका पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांना यश सविस्तर वृत्त असे की,दि. 04/02/2021 रोजी सपोनि अजिनाथ मोरे यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मीळाली की,राजाकीन्ही येथील नयन गॅस एजन्सी चा मालक नामे अमित विजय जैस्वाल हा. त्याचे दुकानात गुटखा तसेच तंबाखुजन्य पदार्थाची अवैध विक्री व साठा करीत आहे अशा गुप्तबातमीदार कडुन असी माहीती मिळाल्या वरून मा. पोलिस अधीक्षक श्री वसंत परदेशी., मा.अप्पर पोलिस अधिक्षक श्री. विजयकुमार चव्हाण, तसेच मा.उपविभागीय पोलिस अधीकारी श्री. यशंवत केडगे यांचे मार्गदर्शनाखाली दि 04/02/2021 रोजी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरिक्षक अजिनाथ मोरे व पो.स्टाफ बिट अंमलदार नापोकाँ /निलेश घुगे ब नं 1002 , पोकाँ/ महेन्द्र दाभाडे ब नं 893 चालक पोकाँ/ काटेकर ब नं 798 यांचे सह ग्राम किन्हीराजा येथे नयन गँस ऐजन्सी दुकानावर छापा टाकला असता सदर दुकान मालक अमित विजय जैस्वाल वय 32 वर्ष रा.राजाकिन्ही याने त्याचे दुकानात अवैधरीत्या गुठखा विक्री व साठा करतांना मिळुन आला वरून त्याचे विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून त्याचे ताब्यातील गुटखा व तंबाखुजन्य पान मसाला पदार्थ किमंत- एकुन 17576 /-रुचा माल कायदेशीररित्या दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आला .

Updated : 5 Feb 2021 3:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top