Home > Crime news > घाटंजी येथील शेत शिवारात युवतीवर प्राणघातक हल्ला

घाटंजी येथील शेत शिवारात युवतीवर प्राणघातक हल्ला

घाटंजी येथील शेत शिवारात युवतीवर प्राणघातक हल्ला
X

•एकातर्फी प्रेमप्रकरणातून घडलेली घटना •

•आरोपी युवकाने विषारी औषधी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न•

तालुका/ प्रतिनिधी, घाटंजी

✍🏻कज्जुम कुरेशी

मो.8308969995

यवतमाळ/घाटंजी : तालुक्यातील मारेगाव शेत शिवारातील युवतीवरील चाकूने हल्ला झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता च्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त घाटंजी शहरापासून पूर्वेकडील ४ की.मी अंतरावर असलेल्या मारेगाव शेतशिवारात पीडित युवती आणि लहान बहीण ह्या आपल्या काकाच्या शेतात कापूस वेचण्यासाठी जात असताना. शेताच्या बांधावर आरोपी युवक नामे चिंतामण कवडुजी पुसनाके वय २४ वर्ष रा.घाटी हा शेतात वाट बघत होता त्यानि तू माझ्याशिवाय दुसऱ्या मुलाशी लग्न केल्यास मी जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तू माझ्याशीच लग्न कर असा तगादा लावला. युवतीने लग्नाला नकार दिल्याने आरोपीचा राग अनावर झाला.आणि त्या आरोपी युवकाने खिशात असलेल्या चाकूने पीडित युवतीच्या पोटातील वार केला. घटनास्थळी लहान बहीन असल्याने तीने माझ्या ताईला चाकूने मारले अशी ओरड करीत आजूबाजूला शेतातील लोकांनी धाव घेतली.

त्या घटनास्थळी लोकांचा जमाव होतांनी दिसता आरोपी युवकाने पळ काढला.

घटनास्थळी उपस्थितांनी युवतीला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना केले तेव्हा पिडीत युवतीच्या पोटात अडकलेल्या चाकु काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध पोलिसांनी घेतला व आरोपीला पकडून आणले असता आरोपीला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता आरोपीला पुढील उपचारासाठी यवतमाळ रवाना केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध प्राणघातक हल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक भुजाडे करीत आहे.

Updated : 30 Jan 2021 5:19 AM GMT
Next Story
Share it
Top