Home > Crime news > शहरात गोळीबार...

शहरात गोळीबार...


औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील बुढीलेन भागात भंगार व्यवसाय आणि तेथील जागेच्या वादातून गोळीबार केल्याची घटना गुरुवारी दि . 28 रोजी मध्यरात्री घडली . या गोळीबारामध्ये अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार ( वय 25 ) असे जखमी तरुणा चे नाव आहे

शहरातील बुढीलेनमध्ये मनपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक भंगार व्यावसायिकांचे गोडाऊन आहे .

तेथील एक व्यावसायिक राजाभाई मेहबूब यांच्या गोडाऊनमागे जब्बारचे घर आहे .

त्याच्या घराकडे जाणारा मार्ग राजाभाईच्या गोडाऊनमधून जातो .

या रस्त्यावर कायम राजाभाईच्या भंगाराच्या गाड्या उभ्या असतात . त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते .

गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला . या वेळी राजाभाईचा मित्र अक्रम शेरखानदेखील उपस्थित होता .

बाचाबाची वाढताच अक्रमने थेट पिस्तूल काढून जब्बारवर गोळी झाडली . यात पिस्तुलाचा निशाणा हुकला व जब्बारच्या मांडीत गोळी लागली .

गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ सुरू झाला . या गोंधळाचा फायदा घेऊन राजाभाई आणि अक्रम दोघेही पसार झाले .

गोळीबार झाल्याचे समजताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला, तोपर्यंत दोघेही पसार झाले होते . जखमी जब्बारला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदरील ठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे .

Updated : 29 Jan 2021 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top