Home > Crime news > बजाजनगरमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा खून

बजाजनगरमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा खून

बजाजनगरमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा खून
X

मात्र सोमनाथ राठोड याचा मारेकरी कोण व त्याने नेमके कोणत्या कारणावरून खून केला. याबाबतचा तपास सुरू आहे.


टिम म-मराठी न्युज नेटवर्क

वाळुज/औरंगाबाद: कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका साठ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निघृणपणे खून केल्याची घटना बजाजनगर येथील पद्मपाणी बुद्धविहाराच्या गेटमध्ये आज सकाळी उघडकीस आली .

औरंगाबाद तालुक्यातील आडगाव येथील सोमिनाथ भुरा राठोड ( वय 60 ) असे खून झालेल्या व्यक्तीमाचे नाव आहे . अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी कारणावरून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला . त्यानंतर तो तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता .

ही घटना सकाळी उघडकीस आली . घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे , पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास कामे सूचना केल्या . श्वानपथकानेही माग काढण्याचा प्रयत्न केला . मात्र सोमनाथ राठोड याचा मारेकरी कोण व त्याने नेमके कोणत्या कारणावरून खून केला . याबाबतचा तपास सुरू आहे .

Updated : 22 Jan 2021 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top