Home > Crime news > दिवशीच्या वेदनादायीं घटनेचा माहूरात निषेध.नराधामाला त्वरित फासावर लटकविण्याच्या मागणीने शहर दुमदुमले.

दिवशीच्या वेदनादायीं घटनेचा माहूरात निषेध.नराधामाला त्वरित फासावर लटकविण्याच्या मागणीने शहर दुमदुमले.

दिवशीच्या वेदनादायीं घटनेचा माहूरात निषेध.नराधामाला त्वरित फासावर लटकविण्याच्या मागणीने शहर दुमदुमले.
X

श्री क्षेत्र माहूर/प्रतिनिधी

माहुर/नांदेड : समस्त मानव जातीला काळीमा फासणा-या भोकर तालुक्यातील दिवशीच्या त्या दुर्दैवी घटनेचे माहूर शहरात पडसाद उमटले असून ते निर्घून कृत्य करणाऱ्या नराधामास त्वरित फासावर चढवा अशी मागणी माहूरकरांनी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांना दि.22 जाने.रोज शुक्रवारला दिलेल्या निवेदनातून केली आहे.


सदर घटनेचा निषेध करण्यासाठी माहूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालया पर्यंत निघालेल्या निषेध मोर्चात माहूरचे योगी शामबापु भारती महाराज,माजी जि.प.सदस्या विमलताई खराटे, छायाताई राठोड, पद्माताई गिऱ्हे, नगराध्यक्षा .शितल ताई जाधव, रेणुका दीशीत, दिशा, शेख फरजानाबी, शिवश्री बावणे, संगीता पोले, शेख हसीना, सुभद्रा तुंबवार, सौंदर्या माळकरी, सुमित राठोड, निरधारी जाधव, गोपु महामुने,मनोज किर्तने, राजाराम गंदेवाड, विजय भगत, अशोक उपलवाड, नवनित देवपुलवार,संजय बनसोडे,संतोष कमटेवाड, विनोद मार्गमवार, कैलास फड, हर्षदिप दिक्षीत यांचेसह अनेकांनी सहभाग घेतला होता. व आपला संताप व्यक्त केला. तहसीलदार वरणगांवकर यांनी शहरवासीयाचे निवेदन स्वीकारले.

Updated : 22 Jan 2021 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top