मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने तरुणाने केले विष प्राशन
zakir.hussain | 21 Jan 2021 3:52 AM GMT
X
X
विशेष प्रतिनिधी म-मराठी न्युज नेटवर्क 9421302699
मराठा क्रांती मोर्चाच्या दत्ता भोकरे पाटील या तरुण कार्यकर्त्याने काल बुधवारी (ता. २०) सायंकाळी सातनंतर क्रांतीचौकात विष प्राशन केले. तत्पूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह करुन प्रश्न मांडले. समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना त्याचे डोळे डबडबले होते. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. मराठा क्रांती मोर्चात पुढे असलेल्या दत्ता भोकरे पाटील याने फेसबुकवर लाईव्हवर म्हटले आहे, 'मराठा' आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
सरकार फक्त राजकारण करत आहे. त्याना कुणाचे कुणाशी काही देणे-घेणे नाही. असे ही तो पुढे म्हणाला.
Updated : 21 Jan 2021 3:52 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire