वाशिम स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडक कार्यवाही, ५ धारदार तलवारी जप्त
आरोपीविरुध्द भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हा दाखल
X
वाशिम स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडक कार्यवाही, ५ धारदार तलवारी जप्त
आरोपीविरुध्द भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हा दाखल
वाशिम(फुलचंद भगत)मा. पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्या पासुन अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्रे,मालमत्तेचे उघड न झालेले गुन्हे उघड करण्यासाठी विशेष मोहिम राबवुन बऱ्याच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.
दिनांक १९/०१/२०२१ रोजी पोलीस निरिक्षक शिवा ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पुसद नाका येथील महात्मागांधी कॉम्पलेक्स मधील गाळा क्र १२,मध्ये विविध कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या पोशाखाच्या दुकानाच्या नावाखाली अवैध रित्या शस्त्रे साठा साठवुन ठेवलेला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी/अंमलदार यांचे पथक तयार करुन वाशिम शहर परिसर पुसद नाका येथे रवाना करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार नमुद ठिकाणी छापा टाकला असता दुकानाचे मालक अमोल नामदेवराव काळकर वय ३४ वर्षे रा सिव्हिल लाईन, वाशिम हे दुकानात हजर मिळुन आले.नमुद दुकानाची झडती घेतली असता दुकानात आरोपीने साठा करुन ठेवलेल्या ५ धारदार लोखंडी तलवारी एकुण किंमत ४०००/- अशा मिळुन आल्या नमुद आरोपीताकडे विचारपुस केली असता त्याबाबत त्याने कोणतेही समाधान कारक उत्तर दिले नाही. सदरचा शस्त्रसाठा जप्त करुन पोलीस स्टेशन वाशिम शहर यांचे ताब्यात देऊन आरोपीविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन वाशिम शहर करीत आहे.सदर कार्यवाहीमध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री.वसंत परदेशी,मा, अपर पोलीस अधिक्षक श्री.विजयकुमार चव्हाण याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकातील सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि शब्बीर पठाण, पोना किशोर चिंचोळकर, सुनिल पवार,निलेश इंगळे यांनी सहभाग नोंदविला.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206