Home > Crime news > दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड,वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड,वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

आरोपीतांकडुन १,९८,८१०रु चा माल जप्त

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड,वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
X

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड,वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

आरोपीतांकडुन १,९८,८१०रु चा माल जप्त

वाशिम(फुलचंद भगत)-मा. पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्या पासुन अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्रे,मालमत्तेचे उघड न झालेले गुन्हे उघड करण्यासाठी विशेष मोहिम राबवुन बऱ्याच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन दरोडयासारखे गंभीर गुन्हे करण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड केली.

दिनांक १६/०१/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सिंघम पोलीस निरिक्षक शिवा ठाकरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,वाशिम ते मालेगाव रोडवरील झोडगा गावाचे अलीकडील पेट्रोलपंपावर काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. सदर बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जे वाशिम शहरामध्ये गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करीत होते त्यांना आदेश दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम मालेगाव रोडवरील झोडगा गावच्या अलिकडील पेट्रोल पंपाचे बाजुस असणाऱ्या एका पडित खोली मध्ये काही इसम असल्याची चाहुल लागली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर खोलीस घेराव टाकुन आतमध्ये प्रवेश केला असता सदर खोलीमध्ये एकुण ६ इसम मिळुन आले त्यांची नावे १ प्रभु उर्फ हनुमान तानाजी गोरे वय ३६ वर्ष रा.सोनखास २.प्रमोद काशीराम मुके वय ३६ वर्ष रा वाकद ३ हनुमान शामराव खारडे वय २९ वर्ष रा.कार्ली गुंज ४.पांडुरंग तानाजी कव्हर वय ३५ वर्ष रा.तामसी ५.गजानन सिमाराम कव्हर वय ३६ वर्ष रा.तामसी ६.शंकर साहेबराव जाधव वय २२ वर्ष रा कार्ली गुंज मिळुन आले त्यांचेजवळुन ३ मोटार सायकल,६ नग मोबाईल २ मिरची पावडर,२ सुरे असा एकुण १,९८,८१०रु चा माल मिळुन आला. त्यांचे विरुध्द पोउपनिरी शब्बीर खान मुनीर खान पठाण वय ३० वर्ष रा.स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन मालेगाव येथे मालेगाव अप.क. १५/२०२१ कलम ३९९,४०२ भादवी सहकलम ४,२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मालेगाव पोलीस ठाणे करीत आहेत.सदर कार्यवाहीमध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री.वसंत परदेशी,मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.विजयकुमार चव्हाण याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकातील सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि शब्बीर पठाण,सफौ भगवान गावंडे,नारायण जाधव,पोना सुनिल पवार,अमोल इंगोले,राजेश राठोड, पोशि निलेश इंगळे सफौचालक रमेश थोरवे यांनी सहभाग नोंदविला.

प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 20 Jan 2021 1:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top