Home > Crime news > खासगी रुग्णालयाच्या आवारात तलवारीने निर्घृण खून

खासगी रुग्णालयाच्या आवारात तलवारीने निर्घृण खून

टिम म-मराठी न्युज नेटवर्क विशेष प्रतिनिधी


गोंदिया - शहरात निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली आहे. ही खूनाची घटना रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संयोग रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली आहे. रवि बोबाडे ( ४० वर्ष रा. धापेवडा) असे मृताचे नाव आहे.

संयोग रुग्णालयाच्या आवारातील गेट जवळच ४० वर्षीय व्यक्तीचा आरोपींनी तलवारीने खून केला आहे. त्या व्यक्तीच्या अंगावरून चारचाकी चालविण्यात आली आहे. खून करून आरोपी घटना स्थळावरून फरार झाले. घटनाची माहिती पोलिसांना मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Updated : 16 Jan 2021 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top