Home > Crime news > दिल्लीची पुनरावृत्ती महाराष्ट्रात! चालत्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये तरुणीवर बलात्कार

दिल्लीची पुनरावृत्ती महाराष्ट्रात! चालत्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये तरुणीवर बलात्कार

म-मराठी न्युज नेटवर्क

वाशीम : नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीचा चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलींनी घटनेनंतर पुण्यात पोहोचल्यावर तक्रार दिल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला.

या तरुणीला सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या शीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी दिली. त्यामुळे सदर युवतीने पुणे पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

हा प्रकार वाशिम जिल्ह्यात घडल्याने पुणे पोलिसांनी वाशिमकडे हा गुन्हा वर्ग केला असून, मालेगाव पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली आहे. आरोपी समीर देवकर असल्याचं पोलिसांनी सांगितले. दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलिस करीत आहेत.

Updated : 11 Jan 2021 2:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top