Home > Crime news > मारेगाव येथे अवैध व्यावसायिकांने महिलेला मारहाण करून केला विनयभंग

मारेगाव येथे अवैध व्यावसायिकांने महिलेला मारहाण करून केला विनयभंग

रात्री उशिरा आरोपी विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

मारेगाव येथे अवैध व्यावसायिकांने महिलेला मारहाण करून केला विनयभंग
X

मारेगाव -: दि.१० जानेवारी मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आला असून अवैध मटका कसिनो (कॉइन बॉक्स)वरली मटका,अवैध दारु विक्री अशाप्रकारे राजरोसपणे सुरु असल्याने याच प्रकारातून एका महिलेला बेदम मारहाण झाली असून तिला अंधारात नेऊन साडी सोडून विनयभंग केल्याचा प्रकार मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडला.


गेल्या दहा महिन्यापासून कोरोणा विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांचा रोजगार गेल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाली.त्यानंतर कसाबसा संसार सुरळीत सुरु असताना मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील पुरुषांना मारेगाव शहरात सुरू असलेल्या कसिनो(काॅईन बाॅक्स) या अवैध धंद्याचा छंद लागल्याने अनेक पुरुष मंडळी या जुगारात लाखो रुपये गमावून बसले.कुटुंब चालविण्यासाठी मोलमजुरी करून कसाबसा उदरनिर्वाह करत असलेल्या लोकांना राहुल जयस्वाल यांनी सुरू केलेल्या कशिनो या खेळाचा छंद लागला असून खेळात हारणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे.यामुळे अनेकांच्या घरात दररोज भांडण-तंटा सुरू आहे.यातूनच एक प्रकार एका महिलेसोबत घडला असून एका महिलेचा पती हा राहुल जयस्वाल चालवत असलेल्या एका कसिनोमध्ये खेळायला गेला व घरातुन नेलेले जवळचे नऊ हजार रुपये त्या खेळात हरला.ही बाब त्या व्यक्तीच्या पत्नीला माहीत होताच ती महिला पतीला शोधण्यासाठी कशिनो नोकरी गेली.मोलमजुरी करून पै-पै जमा केलेली रक्कम जुगारात हारल्याने तिच्या पायाखालची वाळू सरकली.ती कशिनोमध्ये हरलेल्या नऊ हजार रुपये अवैध खेळ चालविणार्‍या राहुल जयस्वाल कडे मागितली असता तिला अंधारात नेऊन तिचा हात पकडून ओढून व साडी ओढून विनयभंग केला.वेळीच त्या महिलेने आरडाओरड केली त्यानंतर त्या महिलेची ननंद व मुलगी आल्याने राहुल जयस्वाल यांनी तिथून पळ काढला.हा घडलेला प्रकार मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद करण्यासाठी गेली असता जवळपास ४ तास थांबवुन ठेवले.अवैध व्यावसायिकां सोबत हितसंबंध असल्याने आधी तक्रार घेण्यास पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली मात्र प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून रात्री आठ वाजता आलेल्या महिलेचा रात्री ११:४० वाजता आरोपी विरुध्द भा.दं.वि ३५४,३५४(अ) कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


_दि.९ जानेवारी रोजी घडलेला प्रकार भारतीय नारी रक्षा संघटनेच्या मारेगाव तालुक्याचे प्रमुख संतोष राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी मारहाण झालेल्या महिलेला रिपोर्ट दाखल करण्याकरिता मारेगाव पोलीस स्टेशनला घेऊन गेले.मात्र पोलीस स्टेशनमधील कर्मचारी रिपोर्ट घेण्यास टाळाटाळ करित होते.ही बाब लक्षात येताच भारतीय नारी रक्षा संघटनेचे संयोजक सुकांत वंजारी यांच्याशी संपर्क केला.सुकांत वंजारी यांनी महिलेला मारहाण झाली व साडी ओढुन विनयभंग केल्याची माहिती रात्री अकराच्या सुमारास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांचेशी संपर्क केला असता गुन्हा नोंद करणे सुरु असल्याचे भारतीय नारी रक्षा संघटनेचे संयोजक सुकांत वंजारी यांना सांगितले.विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अटक न करता त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप भारतीय नारी रक्षा संघटनेने केला.जर आरोपी अटक झाली नाही तर या संदर्भात पोलीस अधिक्षक यांना निवेदन करणार असल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला._

Updated : 10 Jan 2021 9:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top