Home > Crime news > जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी फोडला हंबरडा

जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी फोडला हंबरडा

X

ब्रेकिंग न्युज: दहा बालकांचा जागीच मृत्यू, सात बालकांना वाचविण्यात आले यश

नातेवाईकांच्या सहाय्याने केले बचाव कार्य

आरोग्य उपसंचालक भंडाऱ्यात दाखल

वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू

भंडारा:- भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (एस एन सी यु) शॉर्टसर्किटमळे आग लागल्याने लागल्याने त्यात दहा बालकांचा जागीच मृत्यू झाला तर सात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, शनिवारला मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आउट बॉर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे दिसले. म्हणुन ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितले. युनिटमधील 7 बालकांना वाचविण्यात यश आले आहे. वेळीच अग्निशामक दल घटनास्थळी पोचले. तर दवाखाण्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. एस एन सी यु मध्ये आउट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॅनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर आऊटबॉर्न युनिटमधील दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते दाखल झाले होते. रुग्णालयाच्या परिसरात नातेवाइकांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे. आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल हे नागपूर येथून भंडारा रूग्णालयात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक सुरू आहे. माञ रूगणालय परिसरात नातेवाईकांनी व नागरिकांनी हंबर्डा फोडला आहे.

विलास केजरकर, भंडारा.

Updated : 9 Jan 2021 4:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top