Home > Crime news > कामावरून काढल्याचा राग आल्याने पैठण मधील तिघांची हत्या.

कामावरून काढल्याचा राग आल्याने पैठण मधील तिघांची हत्या.

कामावरून काढल्याचा राग आल्याने पैठण मधील तिघांची हत्या केली होती.

पैठम/औरंगाबाद: पैठण तालुक्यातील कावसान येथील एकाच परिवारातील तिघांचा निघृणपणे खून करणारा आरोपी हा माजी नोकर असल्याचे समोर आले आहे .

स्थानिक गुन्हे शाखा व पैठण पोलिसांनी आरोपीस वैजापूर परिसरातून काल सायंकाळी अटक केली .

अक्षय प्रकाश जाधव ( 27 , रा . जुने कावसान ह.मु. माळीवाडी सोलनापुर ता पैठण ) असे आरोपीचे नाव असून तिघांची हत्या करून तो फरार झाला होता .

मिळालेल्या माहितीनुसार , आरोपी अक्षय हा निवारे यांच्याकडे काम करत होता . परिवारातील सदस्या सारखा त्यास मान होता .

मात्र वर्षभरापूर्वी निवारे परिवाराने त्यास कामावरून काढून टाकले होते . या दरम्यान , निवारे परिवार व अक्षय जाधव यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते याचे पर्यवसान तिहेरी हत्याकांडात झाले . पोलीस निरीक्षक भागवत पुंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून आरोपी अक्षय प्रकाश जाधव हा त्याच्या जवळील एका विना क्रमाकांच्या मोटारसायकलने येवला येथून औरंगाबादकडे येत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक भागवत फुदे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथके तयार करुन पोलीस ठाणे येवला , कोपरगांव , वैजापुर , विरगांव , गंगापुर , शिल्लेगांव , शिऊर व देवगांव रंगारी पोलीस ठाण्यास नाकाबंदी करण्याचे आदेश दिले .

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अक्षय प्रकाश जाधव याचा शोध घेत असतांना तो महालगाव ( ता . वैजापुर ) येथे रोडने वैजापुरकडून गंगापुरकडे एका विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर येतांना दिसल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला . असता त्याने त्याचे जवळील मोटार सायकल सोडून तो शेताने पळून जाऊ लागला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपीचा जवळपास दोन किलो मिटर पाठलाग करुन त्यास पकडले .

चौकशीत अक्षयने जुन्या वादातून तिघांची हत्या केल्याची कबुली दिली . गुन्हा केल्यापासून तो नाशिक , पुणे , मुंबई , जालना , औरंगाबाद इत्यादी ठिकाणी भटकत असे . रात्री रोडच्या कडेला असलेल्या शेतामध्ये झोपत होता असे सांगितले . तसेच त्याच्या ताब्यात मिळून आलेली मोटार सायकल त्याने पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीतील झाल्टा फाटा येथून चोरुन आणल्याची कबुली दिली .

आरोपीच्या ताब्यातून एक मोटारसायकल , एक मोबाईल हॅन्डसेट , एक चाकू , एक लोखंडी रॉड , एक सायकलची लोखंडी चैन असे एकुण 35 हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला .

Updated : 9 Jan 2021 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top