अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
संजय लांडगे | 9 Jan 2021 10:41 AM GMT
X
X
पालघर जिल्हा:प्रतिनिधी
संजय लांडगे
रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून घराच्या दिशेने जात असणाऱ्या दोघा तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली असता यातील चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झालीआहे.
शुक्रवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास रोहन मारवत घाटाळ (वय२२) रा. हरोसाळे येथील घराकडे दीपक मुकणे याच्या सोबत दुचाकीवरून येत असताना सासणेफाटा येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रोहनचा जागीच मृत्यू झाला आहे तर दीपक मुकणेला किरकोळ दुखापत झाल्याने त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
Updated : 9 Jan 2021 10:41 AM GMT
Tags: accident
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire