Home > Crime news > अपहरण करून मुलीला गुजरातमध्ये विकले, वडिलांची पोलिसात तक्रार...

अपहरण करून मुलीला गुजरातमध्ये विकले, वडिलांची पोलिसात तक्रार...


औरंगाबाद (विजय कांबळे): शहरातील मिसारवाडी भागातील एका मुलीला तिचे अपहरण करून गुजरात मधील अहमदाबाद येथे विकले असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सिडको पोलीस ठाण्यात दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसारवाडी भागातील मोहमद अन्सारी यांच्या मुलीला ओळखीच्या तरुणाने व एका महिलेने विश्वासात घेऊन तिचे अपहरण केले. तिला अहमदाबाद येथे नेऊन तीन लाख रुपयांना विकले. अशी तक्रार मुलीच्या वडीलांनी सिडको पोलीस ठाण्यात दिली आहे .

यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 28 Dec 2020 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top