Home > Crime news > दिवसाढवळ्या नजरेनेच हजारो बलात्कार ते ही राजरोसपणे.

दिवसाढवळ्या नजरेनेच हजारो बलात्कार ते ही राजरोसपणे.

म-मराठी विशेष लेख

नागडेपणा फक्त कपड्यांचा किंवा शरीराचाच असतो का ? तो नजरेचा ही असतो, विचारांचा ही असतो आणि चारित्र्याचा सुद्धा असतो. पण पुरूषी मानसिकतेला पौरुषत्वाच्या चश्म्यातून दिसतो तो फक्त देहाचा नागडेपणा आणि तो ही मुख्यत्वे स्त्री देहाचा. कारण हपापलेल्या लिंगपिसाटांना तर ती पुर्ण कपड्यातही नागडीच दिसते. त्यांची नजर एक्स रे सारखी तिच्या कपड्याच्या आरपार जाते. आणि घडतात जागोजागी दिवसाढवळ्या नजरेनेच हजारो बलात्कार ते ही राजरोसपणे. ना कुठली तक्रार, ना एफ.आय.आर, पण शिक्षा मात्र तिला. हो ...तिलाच. मग फिरते ना ती झाकत आणि सावरत स्वतःच्या स्त्रित्वाला. स्वतःच मानसिक खच्चिकरण करून, कुंठाग्रस्त होऊन. लाज वाटायला लागते तिला तिच्याच शरीराच्या अवयवांची. हे मोकळेच असतात कुठे ही लगट करायला, स्पर्शसुख घ्यायला मग तो रस्ता असो की स्टेशन, मार्केट असो की बसस्टॉप. हे घेतात हा विकृत आसुरी आनंद. पण ती हादरते या किळसवाण्या स्पर्शाने, उन्मळुन पडते त्या विखारी नजरेने त्याचं काय? तिला सहन करायला शिकवतो. तिला मर्यादेत जगायला शिकवतो. तिला झाकायला शिकवतो पण यांच्या नजरेच्या, विचारांच्या आणि चारित्र्याच्या नागडेपणाचे काय ?

सपना फुलझेले, नागपूर

Updated : 20 Dec 2020 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top