Home > Business news > येत्या आर्थिक वर्षात पाच हजार कोटीचा टप्पा गाठू

येत्या आर्थिक वर्षात पाच हजार कोटीचा टप्पा गाठू

पत्रकार परिषदेतून बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा यांनी व्यक्त केला विश्वास

येत्या आर्थिक वर्षात पाच हजार कोटीचा टप्पा गाठू
X

येत्या आर्थिक वर्षात पाच हजार कोटीचा टप्पा गाठू

पत्रकार परिषदेतून बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा यांनी व्यक्त केला विश्वास

दि यवतमाळ अर्बन को-ऑप बँक लि. यवतमाळ ही विदर्भ व मराठवाडयात अग्रगण्य असलेली सर्वात जूनी बॅंक आहे येत्या आर्थिक वर्षात आम्ही 5000 कोटींचा व्यवसायचा टप्पा आपल्या सर्वांचे सहकार्याने गाठू असा विश्वास बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा यांनी व्यक्त केला.


यवतमाळ येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना बँकेचे मा. अध्यक्ष अजय मुंधडा म्हणाले बँकेने 57 व्या वर्षात पदार्पण केले असून यवतमाळ अर्बन को-ऑप. बँकेच्या आज रोजी एकूण 34 शाखा आज महाराष्ट्रात कार्यरत आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे झालेले लाकडाउन व जागतिक उदयोगात आलेली मंदी अशा परिस्थितीत सुध्दा बँकेने कर्जाचे व्याजदर कमी केले. कर्जाची थकबाकी एन.पी.ए ही सध्या सर्वच लहान मोठ्या बँकासाठी समस्या झाली आहे. एनपीए चे व्यवस्थापन करतांना मालमत्ता गुणवत्तेचा दर्जा सुधारणे व एन.पी.ए कमी करणे या दोन्ही बाबीस बैंक प्राधान्य देत आहे.


आपल्या बॅकेची सर्व क्षेत्रातील प्रगती चांगली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे बँक समर्थपणे आणि यशस्वीपणे समोर जात आहे. व समोर जात राहील अशी अपेक्षा आहे. बँकींग व्यवसायातील प्रगतीच्या सर्व मापदंडाची पूर्तता करून मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा, माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा सुयोग्य वापर व उच्च दर्जाच्या ग्राहकसेवा प्रणालीचा अवलंब करत बँकेने लक्षणीय प्रगती केली आहेच. नुकतेच मार्च 2022 आर्थीक वर्ष संपले त्यानुसार बॅकेची मार्च 2022 ची आर्थीक स्थिती पुढील प्रमाणे आहे. बँकेच्या एकुण ठेवी लाखात रू. 236921.99 एकुण कर्ज लाखात रू. 172335.89, बॅकेचे भाग भांडवल लाखात रू. 8303.39 असुन वर्कींग कॅपीटल रू. 299473.56 लाख आहे. बँकेला रू. 4886.95 इतका ढोबळ नफा झालेला आहे. आर. बी. आय. मापदंडानुसार CRAR 9 टक्के आवश्यक असतो परंतू आपल्या बँकेचा CRAR 14.23 टक्के असल्यामुळे बॅकेची स्थिती उत्तम असल्याचे सिध्द होते. बँकेने संशयीत व बुडीत कर्जाची तरतुद लाखात रू.15474.11 केली आहे. बँकेची निव्वळ संपत्ती ( Net Worth) लाखात रू. 21958.20 इतकी आहे. नेट एन.पी.ए. टक्केवारी 14.03 आहे.


बँक ठेव विमा महामंडळाची सदस्य असून याव्दारे बँकेतील सर्व ठेवीदारांना रूपये 5.00 लाख पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्राप्त आहे. बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने स्वतंत्र विभागाची निर्मिती केली असून त्याचा बॅंकेला चांगला उपयोग होत आहे. बॅकेव्दारे ग्राहकांकरीता पर्सनलाईज चेकबुक कर्जाचा रक्कम भरणा करण्या करीता इसीएस सुविधा, सीटीएस क्लिअरींग ऑनलाईन स्मार्ट फार्म प्रणाली बीबीपीएस फास्टॅग, मोबाईल अॅप, जनरल इन्शुरन्स व जीवन विमा, भारत सरकार वित्त मंत्रालय व्दारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व इतर विविध सुविधा ग्राहकांकरीता बँकेने उपलब्ध करून दिल्या आहेत.

संचालक मंडळाचे वतीने मी सर्व मा. सभासद बंधु ग्राहक व ठेवीदार यांना विश्वासाने सांगु ईच्छीतो की, बँकेने सर्व क्षेत्रात प्रगती केली असून वसुली करीता सुध्दा अथक परिश्रम केले आहे. यापुढे सुद्धा बँकेस सहकार्य करावे ही विनंती पत्रकार परिषदेत अध्यक्ष अजय मुंधडा, उपाध्यक्ष आशिष उत्तरवार, जेष्ठ संचालक मोहन देव, नितीन खर्चे, प्रमोद धुर्वे, प्रफुल चव्हाण, प्रशांत माघमशेट्टीवार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान गोन्टीमुकुलवार व प्रशासन अधिकारी श्रीधरराव कोहरे उपस्थित होते.

Updated : 8 April 2022 7:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top