Home > Business news > चिमनाजी नगरमधिल रस्ता झाला चिखलमय

चिमनाजी नगरमधिल रस्ता झाला चिखलमय

The road in Chimanaji town became muddy

चिखलमय रस्त्यातून मुक्तता न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्या इशारा

महागांव/यवतमाळ/महाराष्ट्र

महागाव नगरपंचायत मधील सत्ताधार्यांची मनमानीचे राजकारण महागाव वासियांच्या जीवावर ऊठले आहे. स्वच्छता, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, नाल्या सफाईकडे दुर्लक्षाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सार्वजिनक मुतारी असे अनेक प्रश्न शहरवासियांना भेडसावत आहे. मात्र सत्ता एकदा मिळाली की अर्थाजन एकमेव धर्म असे अघोषित धोरण अवलंबत कारभार सुरू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . पावसाळ्यात अनवाणी पायाने चालता ही सुद्धा येत नसलेल्या प्रभाग क्रमांक १७ मधील चिखलमय रस्त्यावर अनेक जण पडले येथील ग्रामस्थांना जीवनाश्यक वस्तूंसाठी बाहेर पडणे अवघड झाले आहे. नागरीकांनी वारंवार सांगून या रस्त्याकडे डागडूगी सुद्धा होत नसल्याने प्रभागातील नागरिकांमध्ये असंतोषाचा पारा निर्माण झाल्याने त्यांनी चिखलमय रस्त्यातून मुक्तता करून चालण्यायोग्य रस्त्यांची मागणी करत आहेत. जर या मागणीकडे तात्काळ लक्ष न दिल्यास येत्या नगरपंचायतच्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा चिमनाजी नगरमधील नागरिकांनी दिला आहे.


"चिमनाजीनगर प्रभाग क्रमांक १७ मधिल कावळे यांच्या घरा पासून ते जाधव यांच्या घरापर्यंत कच्च्या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होतो. संपूर्ण चिखल तुडवत येथून नागरीकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन येथील ग्रामस्थांना रस्त्याची सोय करावी."

(अविनाश नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते)

Updated : 20 Jun 2021 11:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top