Home > Business news > पेट्रोल-डिझेल दर कमी होणार नाहीतः सीतारामन

पेट्रोल-डिझेल दर कमी होणार नाहीतः सीतारामन

Petrol-diesel rates will not go down: Sitharaman

पेट्रोल-डिझेल दर कमी होणार नाहीतः सीतारामन
X

पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी कर कमी होणार नाही, असे स्पष्ट उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी राहाव्यात म्हणून सवलती दिल्या होत्या, त्या मुळे ऑइल बाँडचा जो बोजा तिजोरीवर आला आहे, तो कमी होईपर्यंत अबकारी करात कपात करता येणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यूपीए सरकारने १.४४ लाख कोटी रु.चे ऑइल बाँड जारी केले होते, असे त्या म्हणाल्या. आम्हाला यूपीए सारखा चलाखीचा कारभार करायचा नाही, असा टोमणा त्यांनी लगावला.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने इंधनाचे दर कृत्रिमरित्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ऑइल बाँड बाजारात आणले होते. या ऑइल बाँडची मुदत आता संपत असून त्यांचे व्याज मात्र फेडणे सुरू आहे. सरकारने गेल्या ५ वर्षांत ऑइल बाँडवरचे ६० हजार कोटी रु.हून अधिक व्याज भरले आहे. आणि अजून १.३० लाख कोटी रु. व्याज फेडायचे आहे. हे ऑइल बाँड नसते तर इंधनावरील अबकारी सरकारला कमी करता आले असते, असे सीतारामन म्हणाल्या.

२०१४-१५ या काळात ऑइल बाँडचे व्याज म्हणून सुमारे १०,२५५ कोटी रु. खर्च झाले होते. नंतर २०१५-१६ या वर्षानंतर दरवर्षी ९९८९ कोटी रु. व्याज द्यावे लागते. २०२५-२६ पर्यंत सरकारला ३७,३४० कोटी रु.चे व्याज द्यावे लागणार आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

इंधनाचे दर कमी करण्यासाठी केंद्र व राज्यांनी उत्तर शोधावे, माझे हात बांधलेले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Updated : 16 Aug 2021 7:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top