Home > Business news > पेट्रोल - डिझेल - गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरीत मागे घ्यावी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना दिले निवेदन :- विदर्भ राज्य आंदोलन समिती....

पेट्रोल - डिझेल - गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरीत मागे घ्यावी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना दिले निवेदन :- विदर्भ राज्य आंदोलन समिती....

Petrol-Diesel-Gas Darwad The Central Government has asked for a quick reply, Ghyavi Pantpradhan and Petroleum Minister Yana's request :- Vidarbha State Andolan Committee

पुसद :- विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी पुसद च्या वतीने आज दि . 16 जूनला पेट्रोल - डिझेल - गॅस व इतर वस्तूच्या प्रचंड जिव घेण्या दरवाढी विरोधात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी , पुसद यांना निवेदन देण्यात आले . मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उपविभागीय अधिकारी , पुसद यांचे मार्फत निवेदन पाठवून पेट्रोल - डिझेल - गॅस व इतर वस्तूंची प्रचंड झालेली दरवाढ त्वरीत कमी करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आली . कोरोनाच्या महामारी मध्ये जनतेचे जगने कठिन झाले आहे . रोजगार , व्यापार , शेती , व्यवहार सर्व ठप्प झाले आहे . अशा वेळेस ही सतत दरवाढ करून केंद्र सरकार जनतेची लुटमार करीत आहे . आम्ही निवडून आलो तर पेट्रोल - डिझेल - गॅस सहीत महागाई कमी करू असे आश्वासन भाजपा सरकारने दिले होते , महागाई साठी काँग्रेसवर टिका करणारे भाजपा नेते मात्र केंद्रात भाजपा सरकार बसल्यावर पेट्रोल - डिझेल - गॅसचे भाव दुपटीने वाढविले आहे . या भाववाढीचा विदर्भ राज्य आंदोलन समिती निषेध करते व त्वरीत ही भाववाढ मागे घ्या असे केंद्र सरकारला मा . पंतप्रधान व धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री यांना आवाहन करते अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन अजून तीव्र करेल.

निवेदन देतांनी अब्दुल रहेमान चव्हान तालुकाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती युवक आघाडी,फिरोज खान, संतोष आंभोरे , मोहम्मद जिब्रान , निखिल टोपलेवार , प्रशांत , राज खान , आदि गणमान्य मंडली उपस्थित होती....

Updated : 16 Jun 2021 8:46 AM GMT
Next Story
Share it
Top