Home > Business news > गोदावरी अर्बनचे एम.डी.धनंजय तांबेकर यांचे सहकार प्रशिक्षण शिबिरात व्यख्यान

गोदावरी अर्बनचे एम.डी.धनंजय तांबेकर यांचे सहकार प्रशिक्षण शिबिरात व्यख्यान

Lecture by MD Dhananjay Tambekar of Godavari Urban at Co-operative Training Camp

गोदावरी अर्बनचे एम.डी.धनंजय तांबेकर यांचे सहकार प्रशिक्षण शिबिरात व्यख्यान
X

महाराष्ट्र शासनाकडून राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या सहकार प्रशिक्षण शिबिरात गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच 'कसा गाठावा व्यवसाय उच्चांक' याविषयावर व्याख्याते म्हणून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन लाभणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पत संस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित बँकिंग कोरोना पूर्वीचे व कोरोना नंतरचे या विषयाला अनुसरून विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरास राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील,मा.खा.प्रसाद तनपुरे,आ.सुधीर तांबे,आ.प्रकाश अबीटकर,आ.आशितोष काळे,बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे,नगर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

धनंजय तांबेकर हे गेली सत्ताविस वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत ते बँकिंग तज्ञ तर आहेतच सोबत यशदा,मल्टीस्टेट फेडरेशन, राज्य व सहकार फेडरेशन,बँकिंग क्षेत्रातील अनेक नामवंत प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो युवकांना बँकिंगचे मागर्दशन करीत असतात यांच्या अनुभवी नियोजनाखाली अंत्यत पारदर्शक व्यवहार गोदावरी अर्बन करीत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर,शिर्डी येथे केले आहे.या प्रशिक्षण शिबिरास राज्यातील सर्व पतसंस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक व कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहेत.

Updated : 21 July 2021 2:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top