Home > Business news > यवतमाळ मध्ये पेट्रोलचे भाव झाले स्वस्त,सर्व सामान्य नागरिकांना मिळाला दिलासा

यवतमाळ मध्ये पेट्रोलचे भाव झाले स्वस्त,सर्व सामान्य नागरिकांना मिळाला दिलासा

In Yavatmal, petrol prices became cheaper, all ordinary citizens got relief

यवतमाळ मध्ये पेट्रोलचे भाव झाले स्वस्त,सर्व सामान्य नागरिकांना मिळाला दिलासा
X

यवतमाळ मध्ये पेट्रोलचे भाव झाले स्वस्त,सर्व सामान्य नागरिकांना मिळाला दिलासा

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने वाढत होते . ही भाव वाढ आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाचे सातत्याने भाव वाढ होत असल्याने केंद्र सरकारकडून सांगितले जात होते .यामुळे जनसामान्यांमध्ये मोठा रोष व्याप्त झाला होता. मात्र आंतराष्ट्रीय बाजापेठेत कच्या तेलाच्या किमतीत जवळपास १० टक्क्यांनी घट झाली आहे . यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाली आहे . यवतमाळ मध्ये आज पेट्रोलचे भाव हे ९८.५८ तर डिझेलचे भाव ८८.२४ रुपये प्रती लिटर झाले आहे .पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी १७ पैशानी घसरण झाली आहे . युरोपमध्ये कोरोनाची पुन्हा लाट आल्याने इंधनाची मागणी घटली असल्याचे बोलले जात आहे . याच कारणांनी क्रूड ऑइल चे भावात घसरण झाली आहे . यामुळे भविष्यातही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात आणखी कमी येणार असल्याचे जाणकारणाचे मत आहे .

Updated : 24 March 2021 6:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top