Home > Business news > इन्कम टॅक्ससंदर्भात सरकारची मोठी घोषणा ?

इन्कम टॅक्ससंदर्भात सरकारची मोठी घोषणा ?

Government's big announcement regarding income tax?

इन्कम टॅक्ससंदर्भात सरकारची मोठी घोषणा ?
Xकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना मोठा दिलासा दिला. ती म्हणजे सीबीडीटीने अधिकृत डीलरकडे आयकर फॉर्म 15 सीए आणि 15 सीबी सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढविली आहे.

आता ही तारीख 15 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात आलीय. कागदपत्र ओळख क्रमांक तयार करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलवर दोन्ही फॉर्म अपलोड करण्याची सुविधा नंतर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयकर विभागाची नवीन ई-फायलिंग वेबसाईट सुरू झाल्यापासून करदात्यांकडून याबद्दल तक्रारी केल्याचे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्याची मुदत वाढवण्याची घोषणा करण्यात आली.

करपात्र नसणाऱ्यांनी आयटीआर का भरावा❓

आयटीआर भरण्याचे बंधन नसलेले नागरिकही आयटीआर दाखल करू शकतात. कारण त्याचे काही फायदे आहेत. ते पाहूयात...

बँका अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यायचे असेल उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागतो.

हे तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून देखील ग्राह्य धरले जाते.

अनेक देश व्हिसा द्यायचा असेल तरीही आयटीआर मागतात.

मुदत ठेवीसांरख्या बचत साधनांवर लागलेल्या प्राप्तिकराचा परतावा आयटीआरमुळे मिळतो. इतरही कर देयता यामुळे कमी होते.

जर व्यवसायात तोटा झाला तर त्याचा दावा करण्यास आयटीआर उपयुक्त ठरतो.

तोटा 'कॅरी फारवर्ड' करून भांडवली लाभातून सवलत मिळविण्यासाठी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.

Updated : 23 July 2021 4:33 AM GMT
Next Story
Share it
Top