Home > Business news > गोदावरी अर्बन सलग पाचव्यांदा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

गोदावरी अर्बन सलग पाचव्यांदा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

Godavari Urban honored with Dipstambh Award for the fifth time in a row

गोदावरी अर्बन सलग पाचव्यांदा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित
X

महाराष्ट्रतील सहकार क्षेत्रात भरीव योगदान व सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने गोदावरी अर्बनला सलग पाचव्यांदा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्य फेडरेशनच्या वतीने हा पुरस्कार सोहळा ग्रीनलिफ रिसॉर्ट,गणपतीपुळे,जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता.


या पुरस्कार सोहळ्याचे वितरण राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांच्या हस्ते गोदावरी अर्बनचे मुख्य व्यवस्थापक रवी इंगळे, अधिक्षक व्यवस्थापक विजय शिरमेवार , पुसद व्यवस्थापक भारत राठोड , विणपन व्यवस्थापक महेश केंद्रे , सहाय्यक व्यवस्थापक अकाउंट्स प्रशांत कदम, पुणे शाखा प्रभारी अधिकारी आशिष तायडे यांना प्रदान करण्यात आला.

गोदावरी अर्बन ही महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात कायमच आपल्या नाविन्यपूर्ण कामगिरीमुळे उतुंग शिखर गाठत आहे.राज्यासह केंद्रीय सहकार क्षेत्रातील अनेक नामवंत पुरस्कार गोदावरी अर्बनच्या शिपेचात रुजू झाले आहेत. त्यात राज्य फेडरेशनच्या दीपस्तंभ पुरस्काराने भर घातली आहे.

जगाला सध्या आधुनिक तंत्रज्ञानाने गवसणी घातली आहे.गोदावरी अर्बन आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारची सेवा देण्यासाठी तप्तर असून त्याकरिता सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आयुधांचा उपयोग करीत असते.संस्थेने तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक पाऊल पुढे घालीत सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.यासबोतच संस्थेच्या वतीने आपल्या पाच ही राज्यातील कर्मचाऱ्यांना विभाग निहाय अद्यावत तंत्रज्ञानाच प्रशिक्षण वेळोवेळी दिले जाते. या सर्व कार्याची दखल घेत राज्य फेडरेशनच्या वतीने गोदावरी अर्बनला सलग पाचव्यांदा दीपस्तंभ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

या पुरस्कारा बदल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांनी राज्य फेडरेशन आभार व्यक्त केले तर व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,समस्त संचालक,कर्मचारी,सभासद ठेवीदार,दैनिक ठेव प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले.

Updated : 19 Sep 2022 7:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top