Home > Business news > गोदावरी अर्बनने अल्पावधित घेतलेली गरुड झेप अभिमानास्पद

गोदावरी अर्बनने अल्पावधित घेतलेली गरुड झेप अभिमानास्पद

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांची गोदावरीच्या सहकारसूर्य मुख्यालयास भेट

नांदेड, ता.८ (प्रतिनिधी) – गोदावरी अर्बन संस्थेने अल्पावधित खुप मोठी प्रगती साधली आहे. त्याकडे बघुन गोदावरी अर्बन ही पतसंस्था असल्याचे वाटत नाही. तर एक राष्ट्रीयकृत बँकच वाटते. गोदावरी अर्बनने अल्पावधित घेतलेली हि गरुड झेप अभिमानास्पद असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.८) नांदेड – हिंगोली जिल्ह्याच्या दैऱ्यावर आले असता त्यांनी नांदेड येथे गोदावरी अर्बनच्या तरोडा नाका परिसरातील सहकारसूर्य मुख्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री संजय राठोड, हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, माजी आमदार सुभाष साबणे, माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर- घुगे, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, रुद्र हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोककल्याणासाठी एखादी संस्था चालवणे आणि त्यात सातत्य टिकवून ठेवणे हे सर्वांनाच जमत नाही. मात्र गोदावरी अर्बन संस्थेने अवघ्या दहा वर्षात गोदावरी अर्बनचा पाच राज्यात विस्तार केला आहे. तो अतिशय अभिमानास्पद असाच आहे. त्यामुळे गोदावरी अर्बन ही संस्था न राहता या संस्थेचे बँकेत रुपांतर व्हावे, त्यासाठी राज्यसरकार च्या माध्यमातून जे शक्य ती मदत केली जाईल तसेच केंद्र सरकारची मदतीने गोदावरी अर्बन पतसंस्थेचे बँकेत रुपांतर करण्यास पुढाकार घेतला जाईल असे असेही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले.


दरम्यान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्यच्या मुख्यालयाच्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज सभागृहात बसून "घ्या उंच भरारी ,तुमच्या सोबत गोदावरी" हि गोदावरी अर्बनच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित बघून ते प्रभावीत होत गोदावरी अर्बनने उत्तुंग अशी गरुड झेप घेतली असल्याचे सांगत गोदावरीच्या कार्याचे मनापासून कौतुक देखील केले. गोदावरीची झेप बघून हि संस्था कि, बँक तेच कळत नाही असे मिष्कीलपणे म्हटल्याने सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी गोदावरी संस्थेने सहकार क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीचे तोंडभरुन प्रशंसा केली. व गोदावरीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संचालक एड. रविंद्र रगटे, प्रा. सुरेश कटकमवार, सदाशिव पुंड, गोदावरी अर्बन मुख्यालयाचे मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवी इंगळे, विपणन व्यवस्थापक महेश केंद्रे, शाखा व्यवस्थापक सर्वश्री भारत राठोड , विनोद आदे , धनंजय क्षीरसागर, विजय मोडक , अनिरुद्ध पाथ्रडकर, राहूल कोल्हे , शिवराज वल्लेवाड , पंकज ईंदूरकर , गणेश जाधव, अशोक चोपडे, अरविंद महाजन मुख्य शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे पाटील, मुख्यालय व्यवस्थापक ,गुरुतेज सिंग (प्रशासन) गोपाल जाधव लेखा विभाग प्रशांत कदम , देविदास पोळकर , आय टी विभाग पवन यादव यांच्यासह मराठवाडा आणि विदर्भातील गोदावरी अर्बनचे शाखाप्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 8 Aug 2022 5:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top