Home > Business news > जीडीपी उणे ७.३ टक्के, ४० वर्षांतला नीचांक

जीडीपी उणे ७.३ टक्के, ४० वर्षांतला नीचांक

GDP minus 7.3 per cent, lowest in 40 years

जीडीपी उणे ७.३ टक्के, ४० वर्षांतला नीचांक
X

कोरोनाची महासाथ व त्या अनुषंगाने पुकारण्यात आलेला लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची कमालीची घसरण झाली असून २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा आर्थिक विकास दर उणे ७.३ टक्के इतका घसरला आहे. ही घसरण गेल्या ४० वर्षांतील नीचांक असून लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यात गेल्या तिमाहीतला-जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यानचा आर्थिक वृद्धीदर हा १.६ टक्के इतका राहिला आहे.

त्या अगोदर २०१९-२० या आर्थिक वर्षांत आर्थिक विकासदर ४ टक्के इतका होता. जो ११ वर्षांतला सर्वात नीचांक होता. मॅन्युफॅक्चरिंग व बांधकाम क्षेत्रात घसरण झाल्याने विकासदर खालावला होता. त्यानंतर २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर उणे २४.३८ इतका झाला. त्यावेळी वित्तीय तूट ७८ हजार कोटी रु. इतकी होती जी गेल्या वर्षाच्या २.९ लाख कोटी रु.च्या तुलनेत कमी नोंदली गेली होती. एप्रिलमध्ये कोळसा, क्रूड, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट, वीज या ८ मूलभूत उद्योगांचा वृद्धीदर पाहिल्यास ही वृद्धी ५६.१ टक्के इतकी आहे. मार्चमध्ये ही टक्केवारी ११.४ टक्के होती. नैसर्गिक वायू, पोलाद, सिमेंट व वीज क्षेत्रात कामगिरी दमदार आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या २०२०-२१च्या जारी केलेल्या आकड्यानुसार १९८०-८१ नंतर पहिल्यांदाच देशाचा आर्थिक विकासदर उणे नोंदला गेला आहे.

Updated : 31 May 2021 8:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top