Home > Business news > गोदावरी अर्बनच्या यशात धनंजय तांबेकर यांची मोलाची कामगिरी -खासदार हेमंत पाटील

गोदावरी अर्बनच्या यशात धनंजय तांबेकर यांची मोलाची कामगिरी -खासदार हेमंत पाटील

Dhananjay Tambekar's role in the success of Godavari Urban - MP Hemant Patil

गोदावरी अर्बनच्या यशात धनंजय तांबेकर यांची मोलाची कामगिरी -खासदार हेमंत पाटील
X

गोदावरी अर्बनने शिस्त आणि काटेकोर व्यवस्थापनच्या जोडीतून यशाचे टप्पे पार करत हा पल्ला गाठला आहे.यापुढेही अनेक टप्पे आणि शिखरं गाठायचे आहेत.त्यामुळे हीच शिस्त आणि सोबतच आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याची सचोटी कायम असावी.गोदावरी अर्बनच्या आजच्या यशात धनंजय तांबेकर यांची मोलाची कामगिरी आहे.असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले.ते व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्य नोंदणी अभियान,गोदावरी स्किल डेव्हलपमेंट प्रमाणपत्र वाटप व यावर्षी पहिल्यांदाच सुरू केलेला 'गोदावरी गौरव' पुरस्कार कळमनुरी तालुक्यातील दत्तगुरु फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक गंगाधर शृंगारे,सुरेश शिंदे,शेखर अग्रवाल यांना देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील अध्यक्ष राजश्री पाटील,आमदार बालाजी कल्याणकर,व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,सचिव ऍड.रविंद्र रगटे सर्वश्री संचालक प्रा.सुरेश कटकमवार,साहेबराव मामिलवाड,प्रसाद पाटील महल्ले,अजय सरसमकर, सुषमा तांबेकर,मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे, वैधानिक लेखापरीक्षक जीवन लाभशेटवार , वरिष्ठ व्यवस्थापक रवि इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

"गोदावरीचा"झेंडा देशाच्या पाच राज्यात यशस्वीपणे फडकविता आला कारण गोदावरी अर्बनच्या प्रत्येकामध्ये सकारात्मक वृत्ती आहे.याचे श्रेय धनंजय तांबेकर यांना जाते यात दुमत नाही.मराठवाड्यात सहकाराची परिस्थिती चांगली नसताना सुद्धा आपल्या ठेवीदार ग्राहकांना भक्कम आणि हमी विश्वास देऊन आपल्या कार्याचा आलेख उंचावत ठेवला आहे.माझ्या स्वप्नातील गोदावरी साकार करण्याचे काम व्यस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर आणि संपूर्ण गोदावरी परिवाराने केले असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या की, काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात ते आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला समृद्ध करत जातात म्हणूनच ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचतात.सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आणि समृद्ध करत सकारात्मक विचारांची भावना गोदावरीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये भिनविली आहे.गोदावरी अर्बनच्या आजवरच्या उज्वल यशात धनंजय तांबेकर यांचा मोलाचा वाटा आहे,असेही राजश्री पाटील म्हणाल्या.

यावेळी सत्काराला उत्तर देताना व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर म्हणाले की, सहकाराची जाण व ज्ञान असणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील , आमच्या पाठीशी कायम असणाऱ्या व कामाचे स्वातंत्र्य देणाऱ्या अध्यक्ष राजश्री पाटील आणि संचालक मंडळ या सर्वांचा विश्वास आणि सहकार्यामुळेच हे काम मी मोकळ्यामनाने करू शकलो आणि वाढवू शकलो. भविष्यात देखील आपली साथ आणि विश्वास अशीच असू द्या! माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी "गोदावरी" चे पावित्र्य जपण्याबरोबरच सुरक्षितता अबाधित ठेवण्याचे काम करेल,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच गोदावरी अर्बनचे समस्त शाखा व्यवस्थापक , अधिकारी, कर्मचारी, सभासद ठेवीदार, यांनी व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करीत शुभेच्छा दिल्या.

Updated : 13 Oct 2021 10:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top