Home > Business news > स्थानिक स्वराज्य संस्थेत कर सल्ल्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात खर्च होतील करोडों रूपये

स्थानिक स्वराज्य संस्थेत कर सल्ल्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात खर्च होतील करोडों रूपये

Crores of rupees will be spent in Yavatmal district for tax advice in local bodies

स्थानिक स्वराज्य संस्थेत कर सल्ल्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात खर्च होतील करोडों रूपये
X

यवतमाळ- राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद तसेच ग्रामविकास विभाग अंतर्गत सर्व कार्यालयासाठी शासनाने कर सल्लागाराची नियुक्ती केली आहे. त्याच्या सल्ल्यासाठी वर्षाकाठी करोडो रूपये खर्च होणार आहेत. विविध विकासकामांची बिले अदा करताना त्यातून जीएसटी, आयकरावरील टीडीएस आदि वजावटी ग्रामपंचायती करतात, शासनाकडे चलनाद्वारे भरतात, त्याचे आयकर रिटर्न प्रत्येक तीन महिन्यांना भरावे लागते, जीएसटी रिटर्न वर्षाला सरासरी तीन चारवेळा भरले जाते, ही करविषयक कामे स्थानिक कर सल्लागारामार्फत करून घेतली जायची. गेल्या मार्चमध्ये कर सल्लागार एजंसी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. जयोस्तुते मॅनेजमेंट कंपनीची निवड करण्यात आली. 1 जुर्लपासून तीचे काम सुरू होईल. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांनी जुन्या सल्लागारासोबतचे सर्व करार 30 जून अखेर संपविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. हा निर्णय शसानाने दिला असल्याने विरोधाचे कारण नाही. सल्लागाराची नियुक्ती ऐच्छीक नसून सक्तीची आहे, त्यामुळे नकार देणेही शक्य नाही. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात 111 गावे आहेत, तसेच बाभुळगाव तालुक्यात 141, दारव्हा 147, दिग्रस 81, घाटंजी 121, कळंब 143, केळापूर 141, महागाव 116, मारेगाव 115, नेर 117, पुसद 189, राळेगाव 133, उमरखेड 158, वणी 162, यवतमाळ 152, झरीजामणी तालुक्यातील 128 अशा एकुण ग्रामपंचायतची संख्या 2155 आहे. तसेच 16 तालुके, जिल्हा परिषद कार्यालय 20 आहेत, या सर्वांना एकुण खर्च 123172452 येण्याचा अंदाज आहे. यवतमाळातील दर आणि एजंसीने ठरवून दिलेल्या रेटमध्ये बरीच तफावत असल्याने सरकारने याबाबत पुर्नविचार करावा अशी मागणी होत आहे.

Updated : 24 Jun 2021 4:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top