Home > Business news > Big News : Master Card वर RBI ने घातली बंदी 'हे' आहे कारण

Big News : Master Card वर RBI ने घातली बंदी 'हे' आहे कारण

जाणून घ्या या कारवाई मागचं नेमकं कारण काय आहे?

Big News : Master Card वर RBI ने घातली बंदी हे आहे कारण
X

RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Master Card वर बंदी घातली आहे. आजच हा निर्णय RBI ने घेतला आहे. Master Card ने शिस्त आणि नियम न पाळल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. नव्या नियमाप्रमाणे 22 जुलैपासून कंपनी नव्या ग्राहकांना समाविष्ट करून घेऊ शकणार नाही. RBI ने दिलेल्या निर्णयात असं म्हटलं आहे की मास्टरकार्डने भारतात पेमेंट सिस्टिम डेटा स्टोरेजच्या मानदंडांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे या पेमेंट सिस्टिम ऑपरेटरच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मास्टरकार्डच्या सध्याच्या ग्राहकांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार आम्ही मास्टरकार्ड कंपनीला पुरेसा वेळ दिला होता. तसंच विविध प्रकारे पर्यायही उपलब्ध करून दिले होते. तरीही पेमेंट सिस्टिम डेटा स्टोरेज्या निर्देशांचं पालन कंपनीने केलं नाही. त्यामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागली आहे. एप्रिल महिन्यात RBI ने अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्प आणि डिनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडवर डेटा स्टोअरजेच नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. RBI ने आज दिलेल्या आदेशाचा परिणाम मास्टरकार्डच्या सध्याच्या ग्राहकांवर होणार नाही.

मास्टरकार्ड ही अमेरिकेची कंपनी आहे या कंपनीचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. आता नव्या नियमांप्रमाणे 22 जुलैपासून नव्या ग्राहकांना मास्टरकार्ड ही कंपनी नव्या ग्राहकांना कार्ड इश्यू करू शकणार नाही. या कारवाईची माहिती मास्टर कार्ड या कंपनीने त्यांची कार्ड्स वापरत असलेल्या बँका आणि गैर बँक संस्थाना दिली पाहिजे. आरबीआयने मास्टरकार्डविरोधात पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम अॅक्ट 2007 च्या कलम 17 प्रमाणे कारवाई केली आहे.

मास्टरकार्ड एक पेमेंट सिस्टम ऑपरेटर

मास्टरकार्ड एक पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहे, जो देशातील कार्ड नेटवर्क ऑपरेट करण्यासाठी अधिकृत आहे. 6 एप्रिल 2018 रोजीच्या पेमेंट सिस्टम डेटाच्या संग्रहाच्या आरबीआयच्या परिपत्रकानुसार सर्व सिस्टम प्रदात्यांना हे सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांनी चालवलेल्या रक्कम प्रणालीशी संबंधित संपूर्ण दिवस फक्त सहा महिन्यांच्या कालावधीत भारतातील एकच व्यवहार असेल. सिस्टीममध्ये हे सर्व संग्रहित आहे.

1 मे 2021 पासून नव्या घरगुती ग्राहकांना त्यांच्या कार्ड नेटवर्कमध्ये जोडण्यास बंदी

यावर्षी एप्रिलमध्ये आरबीआयने अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्प आणि डिनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडला पेमेंट सिस्टम डेटाच्या साठवणुकीचे पालन न केल्याचे नमूद करीत 1 मे 2021 पासून नवीन घरगुती ग्राहकांना त्यांच्या कार्ड नेटवर्कमध्ये जोडण्यास बंदी घातलीय. या ऑर्डरचा विद्यमान ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Updated : 14 July 2021 6:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top