Home > Business news > अजय मुंदडा, अमित भिसे व विलास महाजन सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर

अजय मुंदडा, अमित भिसे व विलास महाजन सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर

Ajay Mundada, Amit Bhise and Vilas Mahajan on Sahakar Bharti Maharashtra Pradesh Executive

अजय मुंदडा, अमित भिसे व विलास महाजन सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर
X

भारतातील सहकार क्षेत्रातील सर्वोच्च संघटना असलेल्या सहकार भारती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री अजय मुंदडा यांची तसेच महाराष्ट्र प्रदेश मजूर कामगार प्रकोश्ट प्रमुख पदी श्री विलास महाजन यांची आणि नव्याने तयार करण्यात आलेल्या अमरावती विभाग सह प्रमुख म्हणून श्री अमित भिसे यांची नियुक्ती करण्यात आली.सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे 11 वे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच आळंदी येथे संपन्न झाले.या मधे आगामी काळाकरीता महाराष्ट्र प्रदेशाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या प्रसंगी व्यासपीठावर सहकार भारती राष्ट्रीय संघटन मंत्री संजयजी पाचपोर,प्रदेश अध्यक्ष डॉ. सौ शशी ताई अहिरे,प्रदेश महामंत्री श्री विवेक जी जुगादे प्रामुख्याने उपस्थित होते.विदर्भ मराठवाड्यातील सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष असलेले तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्व करीत असलेले श्री अजय जी मुंदडा आणि महाराष्ट्र राज्य मजूर कामगार संस्थांचा संघाचे राज्यस्तरीय संचालक आणि यवतमाळ जिल्हा मजूर कामगार संस्थेचे अध्यक्ष श्री विलास महाजन तसेच सहकार भारती यवतमाळ जिल्हाध्यक्ष अमित भिसे यांची नियुक्ती सहकार क्षेत्राला चालना देणारी ठरणार आहे.या नियुक्ती बद्दल यवतमाळ जिल्हा सहकार भारती चे पदाधिकारी श्री चिंतामणी पांडे,श्याम लोखंडे,जिल्हा उपाध्यक्ष यशवंत सुर्वे,सौ दीपिका गंगमवार,जिल्हा महामंत्री राम साकळे,राकेश मिश्रा,अजय दंडे
अरुण भिसे,यशवंत पाटील, कांचन झाडगांवकर,संजय जिरापुरे, दीपक दिकुंडवार,अरुण कावडकर,रमेश देशमुख,कवडू पिंपलकर,आयुष ठाकरे,सुशील सरुरकर,,सौ सुजाता महाजन, सौ वीणा देशपांडे,या पदाधिकाऱ्यांसह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.Updated : 15 Oct 2021 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top