Home > Business news > गोदावरी अर्बन ला २२.५० कोटींचा शुध्द नफा , वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

गोदावरी अर्बन ला २२.५० कोटींचा शुध्द नफा , वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

-नवीन वर्षात ग्राहकांना सात टक्के लाभांश मिळणार

गोदावरी अर्बन ला २२.५० कोटींचा शुध्द नफा , वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
X

नांदेड, दि. २५ (प्रतिनिधी): सहकार क्षेत्रात योग्य नियोजन केल्यास त्या संस्थेचा विकास होण्यास वेळ लागत नाही. नऊ वर्षापूर्वी 'हेमंत पाटील आणि राजश्री पाटील' या दापंत्याने गोदावरी अर्बनचे लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. गोदावरीने केवळ पाच राज्यातच नव्हेतर पंचवीस राज्यात आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकवावा, अशी भावना माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केली.

येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भारत ईस्क्वेअरच्या सभागृहात रविवारी (दि.२५) उत्साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी उद्घाटक म्हणून वसंतराव चव्हाण बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांची उपस्थिती होती. या वेळी गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील, उपाध्यक्ष हेमलता देसले, वैधानिक लेखापरीक्षक जीवन लाभशेटवार, सचिव अँड. रविद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश कटकमवार, वर्षा देशमुख, यशवंत सावंत, साहेबराव मामिलवाड, प्रसाद महल्ले, अजय देशमुख सरसमकर, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे/सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, गोदावरीने सहकार क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील उल्लेखणीय कार्य केले आहे. त्या सोबतच कर्मचारी आणि ग्राहकांकरिता स्वतःची कार्यप्रणाली अवलंबविल्याने ग्राहक संस्थेकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. गोदावरी अर्बनने नांदेडसह मराठवाड्याला वैभव प्राप्त करुन दिले आहे, असेही वसंतराव चव्हाण म्हणाले.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कुलगुरु डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, ज्या राज्यात शैक्षणिक व वित्तीय संस्था बळकट असतात त्या राज्याचा विकास अधिक गतीने होतो. गोदावरी संस्थेने सहकार क्षेत्रातील सर्व निकषाची पूर्तता करीत सर्वांगिन प्रगती साधली आहे. संस्थेने मांडलेल्या वार्षिक अहवालात नियोजित कार्यापेक्षा ३० टक्यापेक्षा अधिकचे उद्दिष्ट साध्य केले आहे, ही गौरवास्पद बाब आहे. संस्था आर्थिक ऊन्नती सोबतच आधुनिकिकरण आणि अॅडव्हान्स टेक्नाँलाजीचा उपयोग करत ग्राहकांना अधिक तत्पर्तेने सेवा देते ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे डॉ. भोसले म्हणाले.

यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या मनोगतात, येणाऱ्या काळात संस्था अधिक कार्यक्षमतेने पुढे घेऊन जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना हायटेक प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना गोदावरीच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी संस्था वेगाने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. तर अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या की, दरवर्षी सर्वसाधारण सभा होते. परंतु त्यातून ग्राहकांना वर्षभरात काय सुविधा मिळाल्या, हे अधिक महत्वाचे असते. गोदावरी अर्बन नेहमीच ग्राहकांच्या हिताचा विचार करत आली आहे. या वर्षी देखील गोदावरीने ग्राहकांना ७ टक्के इतक्या भरघोस लाभांची घोषणा केली आहे. मागील नऊ वर्षाच्या कार्यकाळात गोदावरीने अतिशय उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे गोदावरी अर्बनच्या कार्यावर संशोधन करावे, असे कार्य गोदावरी करत असल्याचे श्रीमती पाटील म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी संस्थेच्या वार्षिक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षांच्या परवानगीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालाचे वाचन केले. त्यानंतर उत्कृष्ट ठेवीदार, कर्जदार, गुणवंत विद्यार्थी यासोबतच सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखेस मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समस्त दैनिक, आवर्त ठेव प्रतिनिधी आणि कर्मचारी यांनादेखील बक्षिस देऊन त्यांचा सत्कार केला.


या सभेसाठी मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे, वरिष्ठ व्यवस्थापक रवि ईंगळे , मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, लेखा व्यवस्थापक आनंद संगावार,संशोधन व विकास व्यवस्थापक रिद्धी शर्मा, विपणन व्यवस्थापक महेश केंद्रे, देविदास पोळकर, साहाय्यक व्यवस्थापक प्रशांत कदम, कर्ज अधिकारी चंद्रशेखर शिंदे, प्रशासकिय अधिकारी गोपाळ जाधव, तंत्रज्ञान प्रमुख पवन यादव, मुख्यशाखेचे शाखाधिकारी अविनाश बोचरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी भूषण अयाचित यांनी केले.

पुरस्कार: मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे यांना एक्सलन्स अवॉर्ड, यवतमाळच्या मुख्य शाखेचे रवी इंगळे- ट्रीपल सेच्युरी अवॉर्ड, मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार- एक्सलन्स अवॉर्ड, पुसद शाखा भारतकुमार राठोड- सेच्युरी अवॉर्ड, यवतमाळ मेन लाईन शाखा अमित पिंपळकर- विक्रमादित्य अवॉर्ड, बेस्ट असेट ब्रँच अवॉर्ड दिग्रस शाखेच्या राहुल कोल्हे आणि चिखली शाखा दीपक अवसरमोल यांच्यासह गोदावरी अर्बनच्या कर्मचाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Updated : 2022-09-27T02:46:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top