Home > Business news > वाशिम जिल्ह्यात आदिवासी महिलांना करावा लागतो जीवघेणा बिबा उद्योग

वाशिम जिल्ह्यात आदिवासी महिलांना करावा लागतो जीवघेणा बिबा उद्योग

वाशिम जिल्ह्यात आदिवासी महिलांना करावा लागतो जीवघेणा बिबा उद्योग
X

#Washim वाशिम जिल्ह्यात आदिवासी महिलांना करावा लागतो जीवघेणा बिबा उद्योग

वाशिम:- कोरोनाच्या महामारीमुळे गावात परतलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध नसल्याने, वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी महिलांना जीवघेणा बिबा उद्योग करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील अमानी, जऊळका, अमानवाडी, हनवतखेडा, कारली या गावात अजूनही आदिवासी महिलांना करावा लागत असलेल्या बिबा उद्योगामुळं जिल्हा प्रशासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून काम चालू करण्याची मागणी केली जात आहे.

कोरोनामुळे बाहेर राज्यातून गावात परत आलो. मात्र गावात काम मिळत नसल्याने हा जीवघेणा बिबा उद्योग करावा लागत आहे. जर जिल्हा प्रशासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून काम दिलं तर हा उद्योग करण्याचं काम पडणार नाही असे महिला सांगतात.बिब्यातली गोडंबी काढून धनिकांची देहयष्टी सांभाळणारा येथील आदिवासी समाज मात्र बिब्याच्या तेलाने पार होरपळला आहे. गोडंबी काढताना चेहरयावर उडणाऱ्या बिब्याच्या तेलाने येथील कितीतरी मुली विद्रुप झाल्याने त्यांच्या भावी संसाराची राखरांगोळी होत आहे.

हे काम विशेषत: महिला व मुलींना करावे लागत आहे. शेतीत आता कुठलेही काम मिळत नाही. त्यामुळं रोजगार हमी योजनेची कामेही थंड बस्त्यात आहेत. घरसंसाराचा गाडा कसा चालवावा हा यक्ष प्रश्न. म्हणून बिबा फोडणे व त्यातून गोंडबी काढणे यामध्ये अक्षरश: शरीरावर इजा होतात.या व्यवसायाने वयात आलेल्या आदिवासी समाजाचे मुलींचा चेहरा विद्रूप होय असून, त्यामुळे जीवन करपविणारा हा त्यांना बघायला येणारया मुलांकडून नापसंती बिबा फोडण्याचा येते. मजुरीमध्ये त्यांना जेमतेम 100 रू. रोज व्यवसाय अमाणीमध्ये पडतो. त्यावरच त्यांना उदरनिर्वाह करावा लागतो.

महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही एकही योजना अस्तित्वात आली नाही.त्यामुळं वाशिम जिल्ह्यात आदिवासी महिलांना रोजगारा अभावी हा जीवघेणा बिबा उद्योग करावा लागत आहे.त्यामुळं आतातरी अशा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Updated : 31 Dec 2020 4:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top