Home > Business news > यवतमाळ अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकिंग शेवटच्या घटका पर्यंत पोचविणार ! अजय मुंधडा अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक

यवतमाळ अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकिंग शेवटच्या घटका पर्यंत पोचविणार ! अजय मुंधडा अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक

यवतमाळ अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकिंग शेवटच्या घटका पर्यंत पोचविणार ! अजय मुंधडा अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक
X

यवतमाळ अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकिंग शेवटच्या घटका पर्यंत पोचविणार ! अजय मुंधडा अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक

दिनांक 11/11/२० हिंगणघाट ,यवतमाळ अर्बन बँकेचा हिंगणघाट शाखेचा 7 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला .यवतमाळ अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकिंग शेवटच्या घटका पर्यंत पोचविणार ज्याला कर्जाची आवश्यकता आहे व पात्र आहे त्याला बँक कर्ज देते बँके जवळ कर्ज वसुली करीता सक्षम यंत्रणा आहे सात वर्षात हिंगणघाट शाखेने ज्या ठेवी गोळा केल्या कर्ज वाटप केले ,ग्राहकांचा विश्वास संपादन केला ते कर्मचाऱ्यांनी परीवार म्हणून केल्याने सहज शक्य झाले .असाच ग्राहकांचा विश्वास वृद्धीगत व्हावा असे मनोगत अध्यक्ष अजय मुंधडा यवतमाळ अर्बन बँक ह्यांनी वर्धापन दिनाचे उदघाटक म्हणून बोलतांना केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा संघचालक जेठानंदजी राजपूत होते . विभागीय अध्यक्ष प्रशांत माधामशेट्टीवार म्हणाले ,यवतमाळ अर्बन बँक ही राष्ट्रीयकृत बँके सारख्या सोइ ग्राहकांना पुरवत आहे बँकेने कर्जाचे व्याजदर कमी केले आहे नोटबंदी असो की कोरोना महामारी बँकेने ग्राहकांना जी सेवा दिली त्यामुळे जनमानसात बँकेची आपली बँक यवतमाळ अर्बन बँक म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे .आज आपली लाक्षणीय उपस्थिती हेच महत्वाचे आहे असाच विश्वास वाढत रहावा ,बँकेनी बँकेचा प्रसार व प्रचार करीता मार्केटींग विभाग निर्माण केला आहे पण खरे मार्केटींग हे ग्राहकाना मिळणारी सेवाच करतात असे ते म्हणाले ,व्यासपीठावर साह्य सर व्यवस्थापक तथा वणी विभागाचे सचिव गजानन वैद्य ,विभागीय अधिकारी भगत होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक घनश्याम कडू ह्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राउलकर ह्यांनी केले.आभार भास्कर धोटे ह्यांनी मानले.कार्यक्रमाला शाखा व्यवस्थापक गजानन ठोंबरे वणी,अरविंद खाडे गढचांदूर,विजय सराफ चंद्रपूर,पराग दवंडे भद्रावती व प्राधिकृत अधिकारी प्रमोद सप्रे,प्रसाद नावलेकर,अरुण राउलकर प्रामुख्याने हजर होते.

शाखेतील अधिकारी बंडू कावडकर, कर्मचारी भास्कर थोटे, चेतन कोसुरकर,सुशांत पट्टे,किशोर राऊत,अनिल म्यानमवार कार्यरत होते .जे ग्राहक ,सभासद तथा मान्यवर उपस्थित होते त्यांना बँके तर्फ़े भेट वस्तू देण्यात आली ,ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे शंका समाधान करण्यात आले .कार्यक्रमाला नगरसंघचालक विजयसिंग मोहता ,निखाडे मॅडम ,रामेशजी गुप्ता,अमित बोबडे ,काळे ,मराठे साहेब सह अनेक ग्राहक उपस्थित होते.

प्रसाद नावलेकर

Updated : 14 Nov 2020 4:28 AM GMT
Next Story
Share it
Top