- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

API मयुर साहेबराव भामरे यांनी वाढदिवशी शहरातील दिव्यांग मुलांचा जेवण देऊन वाढदिवस साजरा केला
X
जाकीर हुसैन 9421302699
तस म्हटलं तर वाढणार वय सुखावह अजिबात नाही, तरी वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात हल्ली पडलाय। जन्मापासून मृत्यूपर्यंत जाण्याचा या प्रवासात आणि प्रवाहात जागोजागीचे थांबे म्हणजे वाढदिवस असावेत। तरीही 1 जानेवारी, 1 ते 10 जून, 1 ते 10 जुलै या जन्म तारखांकडे संशयाने पाहण्याचा नियम काही अजून मुडत नाही, माझा वाढदिवस मार्चचा, त्यामुळे त्यातून तरी माझी सुटका आहे.
याही वर्षी नित्यनियमाने वार्धक्याकडे होणाऱ्या पाऊल वाटेवर वाढदिवसाचा थांबा आला, विचार आला की, 300 रुपयांचे केक, 10000 ची पार्टी याहिपलीकडे जाऊन पहावं, बघावं एखादं निखळ हसू, कुणाच्यातरी ओठावर , आपल्या वाढदिवशी।
विचार ठरला कृतीत उतरवण्यासाठी, शहरातील दिव्यांग मुलांचा शाळांचा शोध घेतला, एक दिव्यदृष्टी शाळा व एक विशेष शाळा मिळाली, त्यातही दुर्दैव असं, माझासह अनेकांना ह्या शाळा शहरात आहेत , याचीच भ्रांत नव्हती.
आपल्याच मोबाइलमध्ये आपलेच विश्व बनवलेले आपण, दुसऱ्यांच्या आयुष्यात फक्त चार्जेर पुरते लक्ष घालतो हेही तितकेच खरे।
दिनांक ठरला, वेळ ठरली, मित्र व सहकारी मंडळींचा साथीने आधी दिव्यदृष्टि शाळेत पोहोचलो, विद्यार्थी पावले मोजत बरोबर आपापल्या जागेवर जेवायला येऊन बसली, सुरेल प्रार्थना झाली, आम्ही जेवण वाढले. मुले बघू शकत नव्हती , पण हाथाने हात हातात घेऊन हसत होती, एक विकत न घेता येणारा आनंद आम्हांस लाभत होता। ऊर भरून आला होता, देवावर चिडलो हि मी थोडासा, इतका आघात कुणाचा आयुष्यावर? समाधानाने त्यांना खाऊ घातले। मुले जेवून उठल्यावर बाहेर रांगेत बसली. त्यांना नॅपकिन व हॅन्ड वॉश चे वाटप केले। फुल ना फुलाची पाकळी म्हणून! मुले आनंदात होती आणि आम्ही स्वर्गसुखात।
त्यानंतर,पाऊले विशेष शाळेकडे वळली. मुले जेवणाचा ताटावर मांडी घालून सज्ज होती, शब्द त्यांचा ओठात नाही तर डोळ्यात देवाने कैद केले होते. डोळ्यांनीच खानाखुणा झाल्या. त्यांनी हाथ हवेत उंचावून आमचे स्वागत केले. विना शब्दांचा भावना पोहोचल्या, त्यांना हि व आम्हांला हि।
त्यांचा डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता, तेथील सरांचा आग्रहाखातर मी मुद्दाम युनिफॉर्म घालून पोहोचलो होतो. त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता अन माझा पण। विलक्षण प्रेमाने मुले आमचाकडे पाहत होती, पूर्वाश्रमीची ओळख असावी बहुधा। हातांनीच संवाद साधले गेले. त्यानंतर त्यांनाही नॅपकिन व हॅण्डवॉश वाटप करण्यात आले। मुलांचा सेल्फी घ्यायचा उत्साह, स्वतःला सेलिब्रेटी झाल्याचा आभास निर्माण करत होता। पैशाने जग विकत घेता येत असेलहि, पण शुद्ध आनंद माणूसकीतून मिळतो, हे चटकन लक्षात आले।
त्यांचा गोड चेहऱ्यांवर हाथ फिरवून,मला दिलेल्या सुखाची जाणीव त्यांना करून दिली। तेही सुखावले, त्यात खाकीची भर होतीच। मन कृतकृत्य झालं, वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला म्हणून।
शेवटी गालिब यांचा शेर आठवला,
"जिंदगी उसकी जिसकी मौत पे जमाना अफसोस करे ग़ालिब;
यूं तो हर शख्स आते हैं इस दुनिया में मरने के लिए।"
प्रसिद्धीसाठी नाही तर छोट्याशा प्रेरणेसाठी,