Home > Advertise > नगर परिषद कार्यालय उमरखेड जि. यवतमाळ अनाधिकृत ले-आऊट संबंधी जाहीर सुचना

नगर परिषद कार्यालय उमरखेड जि. यवतमाळ अनाधिकृत ले-आऊट संबंधी जाहीर सुचना

Municipal Council Office Umarkhed Dist. Yavatmal Public notice of unauthorized layout

नगर परिषद कार्यालय    उमरखेड जि. यवतमाळ    अनाधिकृत ले-आऊट संबंधी जाहीर सुचना
X

नगर परिषद कार्यालय

उमरखेड जि. यवतमाळ

अनाधिकृत ले-आऊट संबंधी जाहीर सुचना

सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, उमरखेड नगरपरिषद क्षेत्रामध्ये काही जमीन मालक/ जमीन विकासक नगर परिषद कार्यालयाची विकास वापर करण्याची परवानगी प्राप्त न करता निवासी अथवा वाणिज्य प्रयोजनासाठी अनाधिकृत अभिन्यास (ले-आऊट) निर्माण करूण स्टॅम्प पेपरवर नोटरीव्दारे सदर अभिन्यासातील भुखंड विक्री करीत आहेत. तरी सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, अशाप्रकारे निर्माण करण्यात येणाऱ्या अनाधिकृत अभिन्यासामधील (ले-आऊट) भुखंड स्टॅम्प पेपरवर नोटरीव्दारे खरेदी करु नये. शासन निर्णय क्र. एनएपी- २०१६/प्र.क्र. ७ / टी-१ दि. २२ जानेवारी २०१६ अन्वये नियोजन प्राधिकारी तथा मुख्याधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सदर अनाधिकृत अभिन्यासामध्ये (ले-आऊट) कोणत्याही प्रकारचे विकासकाम (बांधकाम करण्याकरिता परवानगी देण्यात येणार नाही.

तसेच नागरिकांना आवश्यक अस सुविधा जसे पाणीपुरवठा, पथ दिवे (स्ट्रिट लाईट), रस्ते बांधकाम, नाली बांधकाम, दैनंदिन स्वच्छता व ईतर नगरपरिषदेशी संबंधीत असलेल्या नागरी सुविधांची पुर्तता करण्यात येणार नाही. तसेच अनाधिकृत अभिन्यासातील भुखंडाची नोंद नगर परिषद कार्यालयाच्या असिसमेंट रजिस्टरमध्ये करण्यात येणार नाही याची संबंधितांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. तरी शासन निर्णय क्र. एनएपी- २०१६/प्र.क्र.७/टी.-१ दिनांक २२ जानेवारी २०१६ अन्वये नियोजन प्राधिकारी तथा मुख्याधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सर्व नागरिकांना पुनश्चः सुचित करण्यात येते की, नगरपरिषद उमरखेड क्षेत्रामध्ये भुखंड (प्लॉट ) खरेदी करण्यापुर्वी अभिन्यास (ले-आऊट) धारकाने नगर परिषद कार्यालयाकडून विकास वापराची परवानगी घेतली आहे किंवा नाही याची शहानिशा करुनच भुखंड खरेदी करावा. तसेच स्टॅम्प पेपरवर नोटरीव्दारे कोणताही अनाधिकृत व्यवहार केल्यास होणाऱ्या नुकसान भरपाईस भुखंड धारक स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

मुख्याधिकारी नगरपरिषद, उमरखेड

Updated : 28 March 2022 7:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top