विजय कुमार बुंदेला यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !
Happy Birthday to Vijay Kumar Bundela!
X
विजय कुमार बुंदेला यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !
विजयकुमार बुंदेला जिल्ह्याला सुपरिचित परिचित असलेले व्यक्तिमत्व यांच्या यशामागे एक संघर्षमय कहाणी आहे.अशा या संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचा आज जन्मदिवस.
विजयकुमार बुंदेला आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये यांचा दबदबा असून अनेक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उजागर करण्यात यांचा विशेष वाटा आहे.यांनी मागील काही वर्षांमध्ये मैत्रये प्लाॅटर्स अँड स्ट्रकर्चर्स प्रा.लि.,ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक असो,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो,उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय असो किंवा बाबाजी दाते महिला सहकारी बँक, असो यामधील नियमबाह्य प्रकार चव्हाट्यावर आणून अनेक प्रश्नांना वाचा फोडली.
या व्यक्तीची सुरुवात खऱ्या अर्थाने वडिलांच्या व्यावसायिक वसुलीसाठी वयाच्या चौदाव्या वर्षी सायकलने दैनिक मातृभूमीचे संपादक शरद करवा यांच्याकडे व्यवसायिक वसुलीसाठी गेले असता भेटी मधून त्यांना जाहिरात व्यवसायाच्या पदार्पणाची संधी प्राप्त झाली.शरद करवा यांनी विजयकुमार बुंदेला यांना दैनिक मातृभूमीमध्ये जाहिरात व्यवसाय करण्याचा सल्ला दिला तेव्हा पासुन जाहिरात व्यवसायाला सुरू केली. त्यानंतर स्व.अतुल पांडे व किशोरबाबु दर्डा यांनी दैनिक लोकमत मध्ये जाहिरात व्यवसाय करण्याची संधी दिली.
दैनिक देशोन्नती,दैनिक सकाळ या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती संकलन करण्याची पहिली जाहिरात एजन्सी विजयकुमार बुंदेला यांनी बुंदेला ॲडच्या माध्यमातून नाव लौकिक कमविले.
यानंतर त्यांचे महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार तथा लोकदुतचे संपादक शरद आकोलकर यांच्या मार्गदर्शना मध्ये त्यांनी महाविद्यालयीन वेळेत विविध धार्मिक,राजकिय तसेच सामाजिक संघटनेच्या प्रसिद्धीचे कार्य त्यांनी अविरत केले.त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला अधिकच धार आली व तेव्हापासूनच विजयकुमार बुंदेला यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये जम बसविला.त्यानंतर त्यांनी दैनिक मातृभूमी,अमरावती मंडल यासह सध्या स्थितीत दैनिक सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून आज ते काम पाहत असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहे व
पत्रकार भवन ट्रस्टचे सहसचिव, महावीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष हि जबाबदारी सांभाळत आहेत.
त्यांचा विविध राजकीय सामाजिक स्वयंसेवी संस्थांशी दांडगा जनसंपर्क असून या माध्यमातूनही अनेक समाजकार्य त्यांनी आजवर घडवून आणली आहे.
अशा या संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचा म्हणजेच माझे जिवलग मित्र विजयकुमार बुंदेला यांचा 52 वा वाढदिवस या 52 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा !
सुकांत प्रकाश वंजारी.
सचिव
भारतीय नारी रक्षा संघटना,यवतमाळ.