Home > Advertise > बाळासाहेब मांगुळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार

बाळासाहेब मांगुळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार

मित्र परीवारातर्फे शेतीविषयक शिबीरासह सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनमित्र परीवारातर्फे शेतीविषयक शिबीरासह सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

बाळासाहेब मांगुळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार
X

बाळासाहेब मांगुळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार

मित्र परीवारातर्फे शेतीविषयक शिबीरासह सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी यवतमाळ

जनसामान्यांचे नेते तसेच कॉग्रेस पदाधिकारी श्री. बाळासाहेब मांगुळकर यांचा वाढदिवस दिनांक 4 डिसेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करुन साजरा करण्यात येणार आहे. बाळासाहेब मांगुळकर मित्र परीवाराच्या वतीने शेतीविषयक कार्यशाळेसह विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने समाजातून सुध्दा समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बाळासाहेब मांगुळकर यांचे वाढदिवसानिमित्त शहरातील विविध भागात स्नेहमिलन सोहळा तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता वैदयकीय महाविदयालयात रुग्णांना फळे तसेच खजुराचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर हवामान तज्ञ श्री. पंजाबराव डक यांचे शेतीविषयक व हवामान विषयक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. माणिकरावजी ठाकरे माजी उपसभापती, वि.प. महाराष्ट्र राज्य हे राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मा. खा. बाळूभाऊ धानोरकर खासदार, चंद्रपुर- आर्णी लोकसभा क्षेत्र, मा. श्री. शिवाजीराव मोघे माजी मंत्री तथा कार्याध्यक्ष, महा.प्र.कॉ. कमिटी, मा.प्रा. श्री. वसंतराव पुरके उपाध्यक्ष, आ.वि. महामंडळ, नाशिक (राज्यमंत्री दर्जा) मा. आ. डॉ. वजाहत मिर्झा आमदार तथा अध्यक्ष जि. काँग्रेस कमिटी, यवतमाळ हे राहणार आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मा. श्री. किर्तीबाबु गांधी माजी आमदार, यवतमाळ, मा. श्री. टिकारामजी कोंगरे अध्यक्ष, य.जि. मध्यवर्ती बँक, मा. श्री. किशोरबाबु दर्डा कार्यालय प्रमुख, दैनिक लोकमत यवतमाळ हे राहणार आहे. या कार्यक्रमात शेतक-यांना पंजाबराव डक हे शेती विषयक मार्गदर्शन करणार आहे. शनिवार दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता सेंन्ट्रल सेलिब्रेशन हॉल, मेडिकल चौक, यवतमाळ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या व्यतिरीक्त जामनकर नगर येथे बाळासाहेब मांगुळकर यांची सायंकाळी 7 वाजता लाडूतुला करण्यात येणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता मेडीकल चौकात शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून बाळासाहेब मांगुळकर हे स्पर्धेचे उदघाटन करणार आहे. आकृती व्यायाम शाळा संदीप टॉकीज चौक तसेच स्टेट बॅंक चौक येथे सुध्दा मित्र परीवारातर्फे सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. राज्यावर अजुनही कोरोनाचे संकट घोंघावत आहे. अशा परीस्थितीत बाळासाहेब मांगुळकर मित्र परीवार मात्र सतत विविध सामाजिक उपक्रम राबवून गरीब दुर्बल नागरीकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे समाजातून सुध्दा कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


Updated : 2021-12-03T21:45:55+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top