Home > Advertise > म-मराठी न्युज शासकिय योजना Govt.Schemes

म-मराठी न्युज शासकिय योजना Govt.Schemes

दिव्यंगत्व क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचारी / स्वयं उद्योजक व नियुक्तक संस्थांना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

●योजनेच्या प्रमुख अटी :

• विहीत नमुन्यात समाज कल्याण अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

• अर्जदाराचे दिव्यांगत्व किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

• अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

●आवश्यक कागदपत्रे :

✔ विहीत नमुन्यातील अर्ज.

✔ अर्जदाराचे दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र.

✔ अर्जदाराचा रहिवाशी दाखला.

●लाभाचे स्वरूप असे :

🔹 12 उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग स्वयंउद्योजकांना 10 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र दिले जाते.

🔸 2 दिव्यांगांचे नियुक्तकांना 25 हजार रुपये रोख व मानचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र दिले जाते.

●या ठिकाणी संपर्क साधावा : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Updated : 15 March 2021 4:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top