Home > Crime news > बाल्या बिनेकरची हत्या केलेल्या आरोपीला अखेर अटक

बाल्या बिनेकरची हत्या केलेल्या आरोपीला अखेर अटक

बाल्या बिनेकरची हत्या केलेल्या आरोपीला अखेर अटक
X

#NAGPUR

नागपुर : नागपूरमध्ये शनिवारी भर चौकात सिनेस्टाईलने बाल्या बिनेकर याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाल्या बिनेकर हा आपल्या कारने जात असताना भोले पेट्रोल पंप चौकात कार थांबली. त्याचवेळी पाच आरोपींनी त्याच्या कारच्या काचा फोडून धारदार शस्त्राने हत्या केली.

पाच आरोपींपैकी चेतन हजारे याच्या वडिलांची 2001 मध्ये बाल्या बिनेकरने हत्या केली होती. त्यामुळे त्याचा राग आरोपीच्या मनात होता. दरम्यान, आरोपीचे साथीदार त्याला 'तुझ्या वडिलांची हत्या केल्यावरही तू काहीच करू शकत नाही' असे म्हणून डिवचायचे. त्यामुळे आरोपी चेतन हजारे याने बाल्या बिनेकर याची हत्या करण्याची योजना आखली होती. त्यानुसार चेतन हजारे आणि त्याच्या चार साथीदारांनी शनिवारी त्याची हत्या केली होती.

#RNO #RNONEWS #MAHARASHTRA #NAGPUR #CRIME #POLICE #POLICESTATION #MURDER #CRIMENEWS

Updated : 28 Sep 2020 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top