Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > २ नोव्हेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार गटप्रवर्तक कर्मचारी संघटना निवेदन

२ नोव्हेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार गटप्रवर्तक कर्मचारी संघटना निवेदन

२ नोव्हेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार गटप्रवर्तक कर्मचारी संघटना निवेदन
X

२ नोव्हेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार गटप्रवर्तक कर्मचारी संघटना निवेदन

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती -: महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक कर्मचारी संघटना ( सलग्न-आयटक )जिल्हा शाखा-अमरावती च्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती यांना दि. 2 नोव्हेंबर रोजी 12 वाजता मागण्यांचे निवेदन देणार असल्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे शासनाने आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांना वेतन सुसूत्रीकरण करूण समान मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आरोग्य विभागातील रीक्त जागेवर कंत्राटी कर्मचारी यांचे समायोजन करण्याचा सुध्दा निर्णय शासनाने घेतला आहे , परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत गटप्रवर्तक कर्मचारी महीला ह्या कंत्राटी कर्मचारी असुन सुद्धा त्यांना वरिल दोन्ही ही निर्णयात समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे गटप्रवर्तक महीलांवरअन्याय झालेला आहे. तेव्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व इतरही मागण्यांना घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी जिल्हातील सर्व गटप्रवर्तक कर्मचारी यांनी जिल्हा परिषद अमरावती येथे दुपारी 12 वाजता वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कॉ.प्रफुल देशमुख जिल्हा सचिव यांनी केले आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविली आहे..

Updated : 28 Oct 2020 5:12 PM GMT
Next Story
Share it
Top