Home > महाराष्ट्र राज्य > "15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जन्मदिवस' राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस' घोषित करा"भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र

"15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जन्मदिवस' राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस' घोषित करा"भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र

15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जन्मदिवस राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस घोषित कराभाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र
X

राहुल दिपक येनप्रेडीवार तालुका प्रतिनिधी चामोर्शी 8888013008

15 नोव्हेंबर हा. देशाकरीता शहिद विर भगवान बिरसा मुंडा चा जन्म दिवस आहे.रामायण, महाभारत पासुन तर 1947 पर्यंत देशा करीता शहिद झालेल्या अनुसूचित जमाती/आदिवासी चा सन्मान करत सरकारने 15 नोव्हेंबर " राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस" म्हणून घोषित करावे अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश तर्फे मा.प्रधानमंत्री जी, मा.माहामहिम राज्यपालजी,मा.मुख्यमंत्री जी यांचे कडे निवेदना द्वारे केली आहे.

आज नागपूर जिल्हाधिकारी मार्फत भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, नागपूर व नागपूर शहर तर्फे श्री प्रकाश गेडाम प्रदेश महामंत्री, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश.श्री अरविंद गेडाम प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र. यांच्या नेतृत्वाखाली देन्यात आले.

निवेदनात 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जन्मदिवस " राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस" म्हणून घोषित करण्यात यावे,15 नोव्हेंबर शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी,बिरसा मुंडा याना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे,महाराष्ट्रात 11% च्या लोकसंख्यात असना-या अनुसूचित जमाती चे 67% बजेट कपात करन्यात येउ नये,माहाराष्ट्रात दिवसेन दिवस होत असलेल्या महिलानवरील अत्याचार, बलात्कार याला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव,लाँकडाउन काळातील अनुसूचित जमाती विध्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देन्यात यावी,17 सप्तेंबर च्या शासन निर्णया प्रमाणे महाराष्ट्रातील 11 लाख 55 हजार अनुसूचित जमाती ना दिपावली पुर्वी खावटि कर्ज देन्यात यावे,महाराष्ट्रतील वर्ग 3,4 ची पदे खाजगी कंत्राटदार मार्फत पदभरतीचा वित्त विभागाचा निर्णय रद्द करन्यात यावा,महाराष्ट्रातील 2889 पेसा ग्रामपंचायतीना 2020-21 चा बजेट मधिल 5% निधि त्वरित देन्यात यावे अश्या मागण्या करन्यात आल्या

शिष्टमंडळात प्रकाश गेडाम, प्रदेश महामंत्री, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र. अरविंद गेडाम प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, श्याम धुर्वे प्रदेश सदस्य, रविंद्र पेंदाम नागपूर शहर अध्यक्ष. दिलीप कुडमेथे, राजेश म्हरसकोल्हे,विजय मरापे,भुपेन्द्र मसराम, गीताताई ऊईके विनायक ऊईके,राजेंद्र ईवनाते, सोनु धुर्वे, अमर तुमराम,अरुन ऊईके, विनोद परतेकी,सुशांत धुर्वे, विजय मरकाम,सोनु धुर्वे उपस्थित होते.

Updated : 11 Nov 2020 1:40 PM GMT
Next Story
Share it
Top