- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

?बांधकाम साहित्याचे भाव गगनाला, माञ घरकुल लाभार्थ्यांना तुटपुंजेच अनूदान!?
X
♨️रेती, विटा, मजुरीचा खर्च वाढला, अनुदान मात्र जुनेच♨️
‼️वेळेत घरकुल लाभाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थी चिंतेत‼️
त-हाडी- ⏩सध्या बांधकाम साहित्याचे भाव अव्वाच्या सव्वा झाले असुन घरकुल लाभार्थ्यांना माञ आधिप्रमानेच तुटपुंजे अनूदान मिळत असल्याने घरकुल लाभार्थी चिंतेत असुन आधिच कमी अनूदान आणी त्यात वेळेत हत्ते मिळत नसल्यानेही घरकुल बांधकामे अर्धवटच राहत असल्याने गरीबांना राहावे कुठे हा प्रश्न पडत आहे.
प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे, असे वाटते. प्रत्येक जण घर बांधण्याचे स्वप्न बघत असतो. मात्र विविध कारणांमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांना घर बांधणे शक्य होत नाही. अशांसाठी शासनाची घरकुल योजना आहे. मात्र आता ही घरकुल योजनाही मृगजळ ठरू पाहत आहे. तुटपुंज्या अनुदानात घरकुल बांधावे तरी कसे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडल्याचे धुळे जिल्ह्यात दिसत आहे.जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिले जाते. मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे. अलिकडे बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, मजुरी, सीमेंट आदीत झालेली वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. किमान ५०० चौरस फुट घर बांधकामासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे सार्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. अनेक लाभार्थ्यांचे घरकुल अपुर्णावस्थेत असल्याचे जिल्ह्यात दिसून येते. पहिला टप्पा बांधल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान दिले जाते. परंतु अनेकांचे बजेट पहिल्या टप्प्यातच कोलमडून जाते. घरकुलाचे लाभार्थीही दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक अंदाज घेऊनच घरकुलाचे बांधकाम करावे लागते.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजनेसह आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत शबरी घरकुल योजना राबविली जाते. परंतु घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपयाचे अगदी तुटपुंजे अनुदान मिळते. या अनुदानात घर कसे बांधावे असा मोठा प्रश्न लाभार्थ्यांपुढे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक घरकुलांचे बांधकाम रखडले असून शासनाने घरकुलाच्या निधीत भरीव वाढ करावी अशी मागणी केली जात आहे. परंतु सध्यातरी या बाबत शासनस्तरावर कोणत्याही उपाययोजना होत असल्याचे दिसत नाही.सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर घरकुलाला मंजुरी मिळते. घरकुलाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम करावे लागते. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून अनुदान देण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम स्लॅबपर्यंत आल्यानंतर अनुदान मिळते. परंतु दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुसऱ्या टप्प्यातच अनेकांचे घरकुल अपुर्ण असल्याचे दिसून येते. या अडचणींवर मात करून तिसऱ्या टप्प्याच्या अनुदानासाठी मात्र शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. एकीकडे मजुरीवर जावे की शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे असा प्रश्न लाभार्थ्यांपुढे पडलेला असतो. केंद्र व राज्य सरकारने या सर्व बाबींचा विचार करून घरकुलांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. सध्यातरी जिल्ह्यात अनेकांच्या घराचे स्वप्न अपुर्णच असल्याचे दिसून येते.आधीचेच अनूदानामुळे घराचे स्वप्न अधुरे राहत असल्यामुळे शासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाढिव अनुदान जाहीर करावी अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिले जाते. मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले १ लाख २० हजार अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे. अलिकडे बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, मजुरी, सीमेंट आदीत झालेली वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. ५०० चौरस फुट घर बांधकामासाठी ३ लाखापेक्षा जास्त खर्च येतो.शासनाने विविध घरकुल योजनांचे अनुदान शासनाने वाढवावे.
रावसाहेब पारधी
त-हाडी
---------------------------