Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > ★विजवीतरण जोमात ग्रामस्थ कोमात★

★विजवीतरण जोमात ग्रामस्थ कोमात★

★विजवीतरण जोमात ग्रामस्थ कोमात★
X

◆ पचविस गावाचा विजपुरवठा वारंवार खंडित

त-हाडी ता. 8 (प्रतिनिधी)

महेंद्र खोंडे

वरूळ येथील महावितरण कंपनीच्या कामधकाऊ वृत्तीमुळे वरूळ उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असुन महावितरणचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. या 33/11 केव्ही उपकेंद्रातुन परिसरातील 20 ते 25 गावांना वीजपुरवठा केला जातो. तीन महिन्यापासून उपकेंद्रात सतत बिघाड होत असल्याने वीजपुरवठा तासंतास खंडीत राहत असल्याने परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांचे हाल होत आहे. सध्या भारनियमन नसतांना सुद्धा दररोज लाईट अधूनमधून जातेच त्यात ही दिवसभरात किंवा रात्री अपरात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ महावितरण कंपनीच्या गलथन कारभाराला वैतागले आहेत.

या कार्यालयात परिसरातील20 ते25 गावातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी फक्त एक सहाय्यक सहाय्यक अभियंता,1 लाईनमनपद रिक्त नाही ऑपरेट 3 पैकी 1 कंत्राटी ऑपरेटर कार्यरत असून एका लाईनमन कडे चार गावांचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. वरूळ गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या वर असून फक्त एकच लाईनमन काम सांभाळत आहे.त्यामुळे सध्या वीज ग्राहकांना व्यवस्थित रित्या सेवा मिळत नाही.

!! चौकट !!

विद्युत तारा व खांब झाले जीर्ण :-

या विद्युत उपकेंद्राचे सन 1972 मध्ये कामकाज पूर्ण करण्यात आले होते तेंव्हा पासून आजपर्यंतच्या 50 वर्षाच्या कालावधीत जीर्ण झालेल्या विद्युत तारा तसेच खालून गंजलेले खांब बदलण्याची तसदी सुद्धा महावितरणने घेतली नाही.सध्या वादळी वाऱ्याचे दिवस असल्याने हे वीज खांब कोणत्याही क्षणी खाली कोसळून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जीर्ण झालेल्या खांबावरील विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्याने खाली जमिनीवर केंव्हाही गल्लीत तुटून पडत आहे.

!!चौकट!!

★ त-हाडी व हिंगणी गावाचे स्वतंत्र गावठाण फिडरचे मागणी ★

त-हाडी व हिंगणी गावाची लोकसंख्याचे प्रमाण लक्षात घेता फक्त या गावासाठी स्वतंत्र गावठाण फिटरच्या काम त्वरित चालू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे परंतु सध्या राजकीय हस्तक्षेपामुळे हे काम रखडले आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून सदरील काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

! चौकट !

.साध्य पावसाळापुर्वी फाद्या तोडण्याचे काम सुरू आहे तसेच एका एका फिटरवर पाच ते सहा गावांचा भार असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे..

,(हेमंत सौदाणे सहाय्यक अभियंता वरूळ )

!! चौकट !!

दररोज रोहिञात बिघाड,तारे तुटली, फ्युज गेला असे एक ना अनेक कारणे सांगुन वीजपुरवठा खंडित केला जातो. येथील कार्यालयात दुरध्वनी वर कॉल केला तर ऑपरेटर फोन उचलत नाही.. अशोक सोनवणे (माजी उपसरपंच, त-हाडी.)

Updated : 8 Jun 2020 6:15 PM GMT
Next Story
Share it
Top