- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक
- यवतमाळ आगारातून आषाढीसाठी २०० बसेस सुटणार
- शिळोना पोफाळी रस्त्यावर कारची झाडाला जबर धडक,दोन जन गंभीर जखमी!

◆"वीज वितरणचे ग्रामीण भागातील पोलवरचे तार मोजताहेत शेवटची घटका."◆
X
● 'अर्धशतकी वर्ष उलटूनही तारांचे नूतनीकरण नाही.'●
■ "तार तुटणे,व्होल्टेज समस्यांनी ग्राहक मात्र त्रस्त."■
[ त-हाडी ] ,
【 प्रतिनिधी 】.
★ त-हाडी★ :- गेल्या साठ - सत्तरीच्या दशकापासून ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचे आगमन होऊन दिव्यांचा झगमगाट झाला असला तरी वीज वाहून नेणाऱ्या पोलवरील अल्युमिनिअमच्या तारा नव्याने पुनर्जीवित न झाल्यामुळे त्या शेवटची घटका मोजत ग्राहकांसाठी समस्यांची माहेरघर बनली आहेत.आजरोजी तर या तारांचीच वाट लागलेली असल्याने तार तुटणे,व्होल्टेज कमी पुरविणे,वेळोवेळी फॉल्ट होणे आदी समस्यांनी हाच विभाग त्रस्त झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अर्थात आजच्या वीज वितरण कंपनीने साठच्या दशकात जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील अनेक गावांत विजेचे जाळे विणले असून त्यासाठी ग्रामीण भागात मुख्यत्वे करून अल्युमिनियम तारेचा वापर करून पोलच्या माध्यमातून घरगुती,शेती व व्यापारासाठी वीज पुरवठा सुरू केला आहे.काही गावात त्यानंतरही वीज पोहचली असली तरी याच तारांचा वापर हा झाला असून शहरी भागात मात्र तांब्याच्या तारांचा वापर केला गेला आहे.अल्युमिनिअम ऐवजी तांब्याची तार वीज वहनासाठी सुरक्षित व दीर्घकाळ टिकणारी असतांना शहरी भागात या जुन्या तारांचे नूतनीकरण झाले.मात्र ग्रामीण भागात साठ सत्तरच्या दशकातील ज्या अल्युमिनिअमच्या तारा आहेत त्यावरच कारभार सुरू असल्याने अनेक समस्यांना आयते कोलीत मिळाले आहे.ग्रामीण भागातील ह्या तारा जीर्ण झाल्याने,तार तुटणे,व्होल्टेजचे कमी जास्त होणे हे रोजचेच असून यातून ग्राहकांसोबतच वीज वितरणच्या कर्मचाऱ्यालाही यातून धोका संभवत असल्याने या जीर्ण तारांचे पुनर्जीवन केले जावे अशी मागणी वीज ग्राहकाकडून केली जात आहे.
【 !! लोंबकणाऱ्या तारांना बाधाव्या लागतात काड्या !!】
अनेक वर्षांपासून या तारातुन वीज वहन होत असल्याने या जीर्णो तारा अनेक ठिकाणी लांबल्या आहेत त्यामुळे तारांना तारा चिकटत असल्यामुळे फाँल्ट होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह घरगुती ग्राहकांना दोन्ही तारांच्या मध्ये काड्या बाधाव्या लागत आहे.
शातिलाल ओंकार सावळे
त-हाडी शेतकरी
【 !! ग्रामीण भागातील वीज समस्याकडे कानाडोळाच !!】
पावसाळ्यापूर्वी वीज वितरणकडुन दुरुस्तीच्या नावाखाली धनराशी खर्च करून तारांवरील झाडांची छाटणी असो किंवा इतर किरकोळ कामे घाईगडबडीत केल्या जात असल्यामुळे ग्रामीण भागात भर पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होतात शेती व्यपार व घरगुतीसाठी वीज ही आज अत्यावश्यक बाब झाली आहे. दिवसेंदिवस वीजेचा वापर वाढत आहे पर्यायाने तारावरील वीजचा दाब वाढत चालल्याने जुन्या ताराचे नुतनीकरण ही आज काळजी गरज बनली आहे अजून कित्येक वर्ष जुन्या पोलवरील ताराच्या जागी नवीन तार टाकावी.
(महेश भिमराव पाटील उप सरपंच त-हाडकसबे )