Home > महाराष्ट्र राज्य > ▪️आमची मूल ऑनलाईन शिक्षण घेणार कशी.......

▪️आमची मूल ऑनलाईन शिक्षण घेणार कशी.......

▪️आमची मूल ऑनलाईन शिक्षण घेणार कशी.......
X

▪️ऑनलाईन शिक्षण नको रे बाबा...

?------------------------------?

तालुक्यातील या गावात नेटवर्क चा प्रॉब्लेम.....

,सातपुड्याच्या पायथ्याशी अतिदुर्गम व नवसंजीवनी पाडयापर्यंत मोबाइलची रेज नाही. हयात सामऱ्यादेवी,मालकातर,गधडदेव,बोरपाणी,फत्तेपूर,अभानपुर, गुऱ्हाळपाणी,थुवानपानी, रोशमाळ,प्रधानदेवी, निशानपाणी,पळसपाणी, साकडीपाडा,गुन्याज्यापाडा, तिखीबडी,जामणपाणी,टेभा, चोंदीपाडा, जुनापाणी, खाऱ्यापाडा,डाबक्यापाडा, पिप्रीपाडा यांच्या सह दहा पंधरा पाडयावर रेज येत नाही

▪️15 जून पर्यंत प्रत्येक विध्यार्थ्यांन पर्यंत पुस्तक पोहचणार.

▪️एकूण पुस्तक 60942 संच मोफत वाटली जाणार विध्यार्थयांना

▪️तालुक्यात एकूण 18 केंद्र

▪️तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक संख्या 910

▪️तालूक्यातील 1817 विध्यार्थनकडे च स्मार्टफोन उपलब्ध.

▪️तालुक्यातील एकूण विध्यार्थी संख्या 22,713

1 ते 8 - 68583

1 ते 12- 89347

♦️-------------------------------♦️

तालुक्यातील 03 शाळा Corntain

तालुक्यातील 03शाळा corntain करण्यात आल्या होत्या 4 गावातील शाळे पैकी3 गावाततील शाळेत corntain लोक करण्यात आली होती. त्या शाळेत आता कोणीही नसून शाळा सुरु होण्याच्या अगोदर त्या senitraij करून स्वच्छ केल्या जाणार आहे.

?-------------------------------?

❗त-हाडी प्रतिनिधी ❗

▪️महेंद्र खोंडे ▪️

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्यायल्यावर माणूस गुरगुरायला लागतो,’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. या वाक्यांत बराच मोठा अर्थ दडलेला आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशात आज ज्या काही रोजगाराच्या संधी आहेत, त्यामागे आपल्या शिक्षणपद्धतीचा मोठा वाटा आहे. तसेच माणसाच्या परिवर्तनाचे शेवटचे न्यायासन म्हणजे शिक्षण आणि शिक्षण घेता आले नाही तर? म्हणून या सा-यावर मात करण्यासाठी आता खेड्या पाड्यातहि ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा मोठय़ा प्रमाणावर भर देण्यासाठी शिरपूर शिक्षण विभाग तयारी करताना दिसत आहे.

कोरोनाचा संकट संपूर्ण देशावर पडलं आणि जग थांबले सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. सहाजिकच शिक्षणाचे क्षेत्र याला अपवाद कसे असणार शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली. लोकडॉन मार्चमध्ये जाहीर झाले. त्यानंतर या कालखंडात सर्व शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा या कालावधीत शाळेच्या परीक्षा तसेच विविध शाखांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कालखंड कारण या कालावधीत विविध सबमिशन प्रॅक्टिकल परीक्षा असल्यामुळे विध्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.या शिक्षणाचे फायदे तंत्रज्ञान विकास या क्षेत्रात भर जास्त भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने मजूर व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते सातवीपर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन बघितलेला नाही. तर इयत्ता 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हाताळता येतो. पण त्यांच्याकडे हा फोन नाही. काही विद्यार्थ्यांना पालकांनी स्मार्ट फोन उपलब्ध केला तरी इंटरनेटचा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे.

लॉकडाऊनच्या काळात काही खासगी शाळांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील अभानपुर येथील रवींद्र धनसिंग भिल , छायाबाई रवींद्र भिल यांनी ऑनलाईन शालेविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांची दोन मुले कुणाला आणि अश्विन शाळेत असून त्यांच्या कडे साधा मोबाईल आहे.त्यांना आता चिंता लागली आहे कि लोकडाऊन असल्यामुळे तीन महिन्यापासून हाताला काम नाही आता मुलाच्या शिक्षणासाठी चार पाच हजार रुपयाचा मोबाईल आता आणायचा कोठून ही चिंता त्यांना लागली आहे. शासनाने यासाठी काहीतरी उपाययोजना अगोदर करायला पाहिजे होती असेही ते म्हणाले.

शिरपूर तालुक्यातील 268 जिल्हा परिषद शाळा 10 जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमधील 22,713 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षकांच्या माध्यमातून सुरू आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे येत आहे.

खासगी शाळा ऑनलाईन शिक्षण देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल का याची चाचपणी सर्वेक्षणातून केली जात आहे.

तालुक्यातील एकूण 1817 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन आहे.अशा परिस्थितीत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे अवघड आहे. इयत्ता 8 वी ते 12 पर्यंत या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हाताळता येतो. मात्र त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही. अनेकांच्या कुटुंबातही स्मार्ट फोन नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण देणे सोपे नाही.मंग शिक्षण विभागाला ऑनलाईन शिक्षण करण्याची एवढी घाई का? असा सुरु ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.

?-------------------------------?

स्मार्ट फोन नसलेले विद्यार्थी वंचित राहण्याचा धोका.....

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागातील गोरगरीब पालकांना रोजगार उपलब्द नसल्याने पालक आर्थिक अडचणीत आहेत. सर्वच पालकाकडे स्मार्टफोन नाहीत. ग्रामीण भागात वाडी वस्तीवर मोबाईलला रेंज असेलच असे नाही. त्यामूळे बहुसंख्य विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहतील अस दिसत आहे.

?-------------------------------?

आम्ही ऑनलाईन शाळेसाठी सज्ज....गटशिक्षणाधिकारी

शिक्षण विभागामार्फत 'शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत online शिक्षण उपक्रम राबविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत . 12 जून रोजी केंद्र प्रमुखापासून ते शिक्षका पर्यंत झूम अॅपवर वेबीनार मिटिगं झाली. या मिटिगंमध्ये शिक्षकानी सर्व विद्यार्थी व पालक यांचे whats app ग्रूप तयार करावेत, विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहे त्या सोडवन्यात याव्या याविषयीं गटशिक्षणाधिकारी शांताराम पवार यांनी सूचना केल्या असल्याचे त्यांनी दै सकाळ शी बोलताना सांगितले.

----------------------------------------

प्रतापसिंह गिरासे (पोलीस पाटील त-हाडी )

पालक......

ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी अँड्रॉइड फोन असणे गरजेचे आहे

आपल्या देशात अजूनही मोठी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. तर काही कुटुंब आजही झोपडपट्टीत राहतात काहींना तर फोनमनधला एक बॅटनही कळत नाही जे काय आहे ते मुलंच करतात आता ते पिक्चर बघताय का ऑनलाईन शिक्षण करताय हे त्यांना कस कळणार साहेब.ऑनलाईन शिक्षण म्हटल्यावर थोडा गोंधळ होणारच मात्र विध्यार्थ्यांना डिजिटल चे महत्व कळेल.

?-----------------------------?

ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी वरूनही व्हाट्सअप ग्रुप काढण्यात आला आहे. ऑनलाईन क्लास सुरू झाली असून लहान मुले ऑनलाइन क्लासला बसू लागले आहेत.

लहान मुले एका जागी बसून शिक्षण घेताना दिसत आहे. आज घडीला ऑनलाईन शाळा भरायचे म्हटलंतर त्याला आवश्यक सामग्री प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे गरजेचे वाटू लागले आहे......

?------------------------------?

शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील अभानपुर येतील रवींद्र भिल व छायाबाई भिल झोपडीत असलेले वास्तव्य व त्याचे दोन मुले कुणाला व अश्विन (छायाचित्रे महेंद्र खोंडे)

०------------------------------०

Updated : 15 Jun 2020 4:43 PM GMT
Next Story
Share it
Top