१० नोव्हेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान, पॉवर ऑफ मिडियाचे आयोजन
म मराठी न्यूज टीम
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 31/10/2020
जिल्ह्यातीलचं नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हक्कासाठी पॉवर ऑफ मिडिया हि पत्रकार संघटना मागील २ वर्षापासून कार्य करीत आहे, प्रत्येक पत्रकाराला न्याय मिळावा ह्याहेतुने १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२० या १० दिवशीय अमरावती विभागातील पत्रकारांसाठी व मीडिया प्रतिनिधीसाठी सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक व वृतपत्र क्षेत्रात कार्य करणारे संपादक, पत्रकार, वृत्तपत्र वितरक, लेखक, कॅमेरामन – फोटोग्राफर, केबल ऑपरेटर यांनी अमरावती विभागीय कार्यालयात अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. या नोंदणी अभियानाचा लाभ मिडीयाच्या प्रतिनिधींनी घ्यावा असे आवाहन पॉवर ऑफ मिडियाचे राज्य संघटक संदीप बाजड, विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांच्या सुचनेवरून अमरावती विभागीय सदस्य अमोल नानोटकर यांनी केले आहे. विभागीय सदस्य डॉ.कुशल लोटे, जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, प्रवीण हरमकर, प्रसिद्धी प्रमुख फणींद्र वाडकर यांच्यासह पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांशी सुद्धा पत्रकार बंधू-भगिनी संपर्क करू शकतात. किंवा सदस्य नोंदणीसाठी अडचण निर्माण झाल्यास पॉवर ऑफ मिडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांच्या 09890606193 - 09284070433 या नंबरवर संपर्क करावा.
पत्रकारांनी लेखणीतून कधी हि स्वतःची व्यस्था मांडली नसावी, नाही इतरांसाठी झटत स्वतःच्या लेखणीतून शब्दाचा प्रहर करीत न्याय मिळवून देण्यात माघार सुद्धा घेतली, अशा न्यायप्रविष्ट सर्वसामान्य पत्रकारांची आज हि शासन दरबारी ख-या अर्थाने नोंद नाही, अधिस्वीकृतीधारक हा शब्द राज्यातील बहुसंख्य पत्रकारांना या योजनेपासून वंचित करणारा आहे. ज्यांनी आयु्ष्यभर निष्ठेनं पत्रकारिता केली आहे पण ज्यांच्याकडं अधिस्वीकृती नाही अशा असंख्य पत्रकारांची आज हलाखीची परिस्थिती आहे. सदरची परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक पत्रकारांची व मिडिया क्षेत्रात कार्य कराणा-या बंधुभगीनींची नोंद व्हावी यासाठी पॉवर ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेन ९ ऑगस्ट २०१९ “क्रांती दिनी” अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सर्वसामान्य मिडिया क्षेत्रातील प्रतिनिधींनी “आम्ही पत्रकार आहोत आमची ही शासन दरबारी नोंद करा” अशी मागणी करीत सरकार व शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु मागील व आताच्या सरकारने सुद्धा यावर लक्ष दिले नाही हि पत्रकारांसाठी शोकांतिका म्हणावी लागेल, मात्र आता मिडियातील प्रतिनिधींनी शांत बसून चालणार नाहीतर स्वतःच्या हक्कासाठी ख-या अर्थाने लढा देण्याची वेळ आली आहे, त्यामुळे या सदस्य नोंदणीत सहभागी होऊन स्वतःला एकजूट करावे असे आवाहन पॉवर ऑफ मिडियाचे अमरावती विभागीय सदस्य अमोल नानोटकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रतिनिधी – भुषण महाजन मो. 9850024474 / 9156273113