Latest News

हे राम!

हे राम!
X

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

...............................................................

जग मे सुंदर है दो नाम,

चाहे कृष्ण कहो या राम!

बोलो,राम राम राम!

बोलो,शाम शाम शाम!

.................................................................

प्रसिद्ध गीत गझलकार श्री अनुप जलोटा जी, यांनी सादर केलेल्या प्रसिद्ध अशा गझल मधून वरील काव्यपंक्ती,

श्रीराम यांच्या भक्ती वरती,प्रकाशझोत टाकतात.

प्रसिद्ध कवी, श्री.पिंटू एस कांबळे लिखित,

प्रेम कुणावर करावं?

या त्यांच्या गाजलेल्या काव्यपंक्ती मध्ये,

श्रीराम भक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

प्रेम कुणावर करावं?

श्रीरामाच्या भक्तीपोटी अर्धवट बोरी,

चाखणाऱ्या त्या शबरी वर्ती करावं की,

एका सिते पायी संपूर्ण रामायण घडवणाऱ्या,

त्या रावणा वरती करावं!

प्रेम कुणावर करावं?

असा विडंबनात्मक कवितेचा मजकूर आहे.

...........................................................................

मानवी जीवनामध्ये माणसाचे श्रद्धास्थान विविध प्रकारे वेगळ्या पद्धतीचे असू शकते.या श्रद्धास्थानी अनेकांच्या,

विविध प्रकारचे श्रद्धेय स्थान,असू शकतात. यापैकी,अनेकांचे, प्यार भरी प्रेयसी श्रद्धास्थान,असते.तर अनेकांचे राजकीय श्रद्धास्थान असते, यात सत्ताधारी पाच वर्षासाठी चे दैवत असतात! तर,अनेकांचे आई-वडील श्रद्धास्थान असतात. तर, अनेकांचे धार्मिक व अधार्मिक श्रद्धास्थान असतात.

श्रद्धा,माया, भक्ती,प्रेम,या एकाच नाण्याच्या सर्व बाबी आहेत.

"श्रीराम" हा शब्द असाच एका भावनिकतेच्या पोटी जन्माला आलेला, भक्तिमय वातावरणामध्ये प्रसन्न करून जाणारा, मनाला हेवा वाटणारा, मृत्युलोकी निरोप घेताना, राम नाम सत्य है! या ठिकाणी येऊन थांबणारा, श्रीराम या नावाच्या शब्दप्रयोगाचा अर्थ,मनाला नक्कीच साद घालणारा आहे.भारतीय हिंदू संस्कृती मध्ये श्रीराम हा शब्द, दैवीक अर्थाने,अध्यात्मिक प्रेरणेचे स्फूर्तिस्थान म्हणून, बघितले जाते.भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धेला ऐतिहासिक पुराव्याची जोड दिली जात नाही.वा तशी मागणी केली गेली तरी त्याकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. भारतीय संस्कृतीचे आराध्यदैवत म्हणून, "श्रीराम" या शब्दाला, भावनिक प्रतिसाद देशभरातून मिळत जातो. राम हा नुसता शब्द नाही, तर भावनिक तेला साद घालणारा, देवाचा अवतार म्हणून उदयास आलेला, एक बानी, एक पत्नी, एक वचनी,असा श्रीराम याचा, भगवंत, पाचा पती परमेश्वर, राम भक्तीचा अतूट गोडवा देणारा , राम भक्त श्री हनुमान, यांचेसह श्रीराम हे भारत देशातील संस्कृतीचे आराध्यदैवत आहेत.

श्रीरामाच्या कौटुंबिक जीवनामध्ये,ऐतिहासिक प्रवाहामध्ये राजघराण्यातील राजकीय वारसा मधून, ते थेट 14 वर्षाच्या भोगलेल्या, राजकीय घनदाट वनांमधील विजन वासाचे, चित्रण

पत्नी माता सीतेचे झालेले अपहरण, ते राजा रावण याचे बरोबर, लंकेचा झालेला विजनवास शेवट, हे राम या शब्दाने,

रामायणाला पूर्णविराम मिळतो.

राम भक्त हनुमान!

श्रीराम ही प्रेरणा आहे! श्रीराम ही,भक्ती आहे!

श्रीराम हे मनाला स्फूर्ती देणारी एक ताकत आहे.राम नामाचे चिंतन करत असताना,ध्यान करत असताना, राम नामातून निघणारा बोध,भक्तीभावाने व्यापलेल्या दातृत्वा ला नवीन उजाळा देणार ठरते. भारतातील हिंदू संस्कृतीतील राजघराण्यातील अनेक लोकप्रिय राजा पैकी, एक असा राजा दशरथ पुत्र श्रीराम, आयोध्या नगरी चा लोकप्रिय राजा म्हणून आपली कारकीर्द, वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या साठी, घराघरातील प्रत्येकासाठी, राम नामाचा अध्यात्मिक जप करण्यासाठी, रामायण लिखित श्रीराम,अयोध्या नगरी संपूर्ण भारताचे दैवत बनलेले आहे. श्रीरामाच्या वाट्याला आयुष्यात आलेले अनेक कटू प्रसंग, अल्पशा वाट्याला आलेले राजघराण्यातील जीवन, जंगलामध्ये झालेल्या 14 वर्षाचा, राजकीय विजनवास, सीता मातेचे अपहरण, आणि या सर्व प्रकाराचा साक्षीदार असलेला श्री राम भक्त हनुमान, यांचे वरती लिखित प्रेमाच्या गाथा आख्यायिका, आज अनेक मंदिरांमध्ये वाचल्या जातात पळवल्या जातात, बोधामृत शिकवले जाते.

आयोध्या नगर येथील श्रीरामा जन्मभूमि सोहळ्याच्या मंदिराच्या काष्ट शिल्पाचे भूमिपूजन देशाचे प्रधानमंत्री,

श्री नरेंद्र भाई मोदी जी, यांचे शुभहस्ते होणार आहे. त्यांचा आज सोहळा भूमिपूजनाचा सुरू होणार आहे. राम मंदिर जन्मभूमी उभारल्या पाठीमागे खूप मोठा रक्तरंजित इतिहास झालेला आहे. श्रीराम हे प्रेरणेचे भक्तीच,विद्यापीठ म्हणून बघितलं जातं. मात्र काही लोक, मन मे राम आणि बगल मे सुरी!अशा थोर अध्यात्मिक इतिहासाला,रक्तरंजित,वळण देताना दिसून येत आहेत. आयोध्या नगरी चा राजघराण्यातील माता कैकयी,चा रामायणातील संपूर्ण प्रवास हा आत्मघातकी ठरणारा होता!

अशा अनेक" कैकई" चे, पुत्र उदंड झाले आहेत. एका बाजूला राम नामाचा गजर करायचा आणि दुसऱ्या बाजूला,नरडी वरती सुरा ठेवून,त्याला मृत्यूलोकी पावताना त्याच्या अंत्ययात्रे, सोबत,राम नाम सत्य है,राम नाम सत्य चा गजर आणि घोष करावयाचा, हे राम!

या अहिंसक, शब्दाच्या मार्गाने!

............................................................................

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

मुक्काम पोस्ट असंडोली.

तालुका गगनबावडा.

जिल्हा कोल्हापूर.

email Tanajikamble33@gmail.com

मोबाईल नंबर 80 80 53 29 37.

Updated : 5 Aug 2020 5:43 AM GMT
Next Story
Share it
Top