हायवेच्या कामाकरीता खोदलेल्या खडयात बुडून मृत्यू झालेल्या महिलेच्या अनाथ मुलांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी यांना सादर केले निवेदन....
X
म-मराठी न्यूज़ नेटवर्क
विशेष प्रतिनिधी/वासीक शेख
यवतमाळ,दि.६ : कळम ते राळेगाव नॅशनल हायवे क्रमांक 361/B या हायवेच्या कामाकरीता मुरूम उत्खन्नासाठी खोदलेल्या खडयातील साचलेल्या पाण्यात रेखा देवेद्र पेंदाम हिच्या अपघाती मृत्यू झाला या मृत्यू महिलेचे अनाथ मुलांनी आपल्या जीवनाचे उदरनिर्वाहासाठी संबधीत ठेकेदार कंपनीला दंडित करून ठेकेदाराला नुकसान भरपाई देणे बाबत शुक्रवार दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी मृतकांची मुली कु निशिता देवेद्र पेंदाम यांच्यासोबत वाढोणा बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार नईम शेख,म-मराठी न्यूज़ चॅनलचे सहसंपादक व सामाजिक कार्यकर्ते सैय्यद जाकीर हुसेन,यांचे सह पत्रकार संजय महाजन व पत्रकार वासीक शेख यांनी जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात पिडीत अनाथ मुली कु निशिता देवेद्र पेंदाम यांनी म्हटले आहे की आम्ही आदीवासी प्रधान समाजातील असुन अत्यंत गरीब आणि दारीद्वय रेषेखालील जिवन जगणारे नागरीक आहोत,व माझी आई स्वर्गीय रेखा देवेंद्र पेंदाम ही दि.०७.१०.२०१८ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमारास गावाबाहेरील बेघर वस्तीत असलेल्या हायवे चे कामासाठी लागणाऱ्या मुरुमांच्या उपसाकरीता करण्यात आलेल्या खडयामध्ये साठविलेल्या पाण्याच्या पाणवठ्यावर
कपडे धुण्याकरीता गेली होती त्यावेळी मी,माझा भाउ बंटी तसेच लहान भाउ रोहन तसेच माझ्या आईची बहिण राधाबाई भोला मडावी, सोनम भोला मडावी,असे सर्व कपडे धुण्यासाठी हजर होते. त्यावेळी १२.३० सुमारास माझा पाय पाण्यात घसरल्याने मी खोल पाण्यात जावु लागली होती मला वाचविण्याकरीता माझ्या आईने खुप प्रयत्न केले आणि मला कसे तरी पाण्याबाहेर काढले.परंतु मला वाचवितांना माझी आई रेखा देवेंद्र पेंदाम ही खोल पाण्यात गेल्याने आणि तिला पाहता येत नसल्याने पाण्यात बुडु लागली.आम्ही सर्व लोकांनी आरडाओरड केला.त्यावरून शेजारी राहणारे शेख अकबर शेख ईस्माईल, अमोल वसंतराव सिडाम,संगम पेंदोर, नितीन भाउराव मरापे असे धावत आले. आणि त्यांनी माला पाण्याबाहेर काढले.परंतु माझी आई पाण्यात बुडाल्याने मरण पावली होती.
या घटनेची माहिती माझे वडील देवेंद गणेश पेंदाम यांनी पोलीस स्टेशन वडकी येथे ताबडतोब दिली त्यावरून पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, शव पंचनामा,पोस्ट मार्टम करून लोकांची बयाने घेतली. परंतु या प्रकरणात हायवे च्या बांधकामासाठी आवश्यक असलेले मरूंम उपसा करणाऱ्या कंत्राटदार कंपनी-दिलीप बिल्डकान कंपनी खोदुन ठेवलेल्या खडया योग्य रित्या बुजविला नाही त्यामुळे पावसाचे पाणी साचले आणि या मुळेच माझ्या आईचा जीव गेला. त्या कंत्राटदार कंपनीचा हा निष्काळजी पणा असुज कंत्राटदार कंपनीला हे माहिती होते की, खड़ा बुजविला गेला नाही तर एखादयाचे प्राण जावु शकते.तरी देखील त्यांचेवर पोलीस स्टेशन वडकी येथील पोलीसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.त्यानंतर माझे वडील देवेद्र गणेश पेंदाम याचे दि. २९.०३.२०२० रोजी निधन झाले त्यामुळे मी व माझे दोन लहान भावंड हे पोरके /अनाय झालेले व आमचे समोर उपासमारीचे संकट आलेले असुन आमची परिस्थिती दयनीय झालेली आहे. आमच्या डोक्यावर आई आणि वडीलांचे आश्रय राहिलेले नसल्याने आणि आम्ही परावंलबी जीवन जगत आहे. शासनाची कोणतीही योजनेअंतर्गत आम्हाला मदत मिळाली नाही तसेच संबधीत कत्राटदार कंपनीकडुन देखील माझे आईच्या अपघाती मृत्युचा देखील मोबदला मिळाला नाही. म्हणुन या निवेदनाव्दारे आम्ही अशी विंनती करीत आहो की, या प्रकरणात आम्हाला न्याय दयावा आणि कंत्राटदार कंपनीविरुद गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस स्टेशन वडकी यांना देवुन, योग्य मोबदला देखील कंत्राटदार कंपनी कडुन आम्हाला मिळवुन दयावा ही नम्र विनंती केली आहे.